
Pakistan railway news : पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांच्या रिपोर्टनुसार बुलचिस्तान लिबरेशन आर्मीकडून दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेचे अपहरण केले आहे. या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक गंभीर जखमी झाला असून, रेल्वेमधील सहा सुरक्षा रक्षकांना ठार केलं गेलं आहे. तर जवळपास चारशे पेक्षा अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं आहे.
बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी म्हटले आहे की, क्वेटा येथून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर पेहरो कुनरी आणि गदालार दरम्यान भीषण गोळीबार झाल्याची माहितीआहे. तर रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी सांगितले की, नऊ डब्ब्यांच्या या ट्रेनमध्ये जवळपास ५०० प्रवासी होते.
बुलचिस्तान लिबरेशन आर्मीने इशारा दिला आहे की जर त्यांच्याविरोधात कोणतीही सैन्य कारवाई केली गेली तर ते सर्व प्रवाशांना ठार मारतील. आतापर्यंत एकूण सहा सुरक्षा रक्षक मारले गेले आहेत.
रेल्वेतील ओलीस ठेवलेल्यांमध्ये पाकिस्तानी(Pakistan) सेना, पोलीस, दहशतवाद विरोधी पथक(एटीएफ) आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स(आयएसआय)च्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण सुट्टीसाठी पंजाबला जात होते. या सर्वांनी जर रेल्वेमध्ये काही गडबड केली तर प्रवाशांना ठार केलं जाईल, असं बीएलएने म्हटले आहे.
ऑपरेनश दरम्यान बीएलएच्या दहशतवाद्यांनी महिला, मुलं आणि बलूच प्रवाशांना सोडले आहे. तर प्राप्त माहितीनुसार बीएलएचे फिदायीन यूनटि, मजीद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहेत. ज्यामध्ये फतेह स्क्वाड, एसटीओएस आणि खुफिया शाखा जिराब यांचा समावेश आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.