
Naukri Do Yatra, Palayan Roko Yatra : दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवलेले काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार आता बिहारमध्ये सक्रीय होणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी ते 16 मार्चपासून बिहारमध्ये यात्रेवर निघणार आहेत. त्यांच्या या यात्रेचे नाव ‘नौकरी दो, पलायन रोको’ असणार आहे.
या यात्रेची सुरुवात ते चंपारणमध्ये भितिहरवा गांधी आश्रमातून करतील. सांगितले जात आहे की, या यात्रेच्या अंतिम मंजुरीबाबत कन्हैय्या कुमार(Kanhaiya Kumar) 12 मार्च रोजी दिल्लीत राहुल गांधींचीही भेट घेवू शकतात.
या दिवशी दिल्लीत बिहार काँग्रेसच्या(Congress) नेत्यांची निवडणूक तयारीसाठी राहुल गांधी आणि पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतही बैठक होवू शकते. असं मानलं जात आहे की, कन्हैय्या कुमार राज्यात सक्रीय झाल्याने लालू परिवाराची गांधी परिवारासोबतच्या नात्यात कटूता येवू शकते. याचे कारण मानले जात आहे की, कन्हैय्या कुमार बिहारमध्ये सक्रीय व्हावेत, हे तेजस्वी यादव यांना नकोय.
तिकडे कन्हैय्या कुमार यांचे निकटवर्तीय मानतात की, ते बिहारमध्ये(Bihar) सक्रीय होवू इच्छित आहेत. यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आधीची वेळ अगदी योग्य आहे. कन्हैय्या कुमार हे बिहारचे रहिवासी आहेत. 1987मध्ये बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील तेघरा विधानसभा क्षेत्रातील छोट्या गावात त्यांचा जन्म झाला होता.
कन्हैय्या कुमार यांचे शालेय शिक्षण बरौनीच्या आरकेसी हायस्कूलमधून झाले आहे. शालेय जीवनात त्यांचा अभिनयाकडे ओढा होता. ते इंडियन पीपल्स थिएटर असोशिएशनचे सदस्यही होते. वर्ष 2022मध्ये पाटणाच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तेथूनच त्यांचा राजकीय प्रवास देखील सुरू झाला. ते अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाचे सदस्य बनले.
यानंतर ते दिल्लीत गेले आणि तिथे जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून पीएचडी केली. तिथे 2015 मध्ये विद्यार्थी संघाची निवडणूक जिंकली आणि अध्यक्ष बनले. 2019मध्ये कन्हैय्या कुमार यांनी सीपीआयच्या तिकीटावर बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र भाजप(BJP) उमेदवार गिरिराज सिंह यांच्याकडून ते पराभूत झाले होते. यानंतर 2021मध्ये ते काँग्रेसशी जोडले गेले. कन्हैय्या कुमार त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.