Indian Army Strike: '24 ते 36 तासांत भारतीय लष्कर हल्ला करणार', पाकिस्तानची झोप उडाली, मध्यरात्री मंत्र्याची पत्रकार परिषद

Attaullah Tarar Said Indian Army May Strike Within 24–36 Hours : मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी म्हटले पहलगाम हल्लामध्ये पाकिस्तानाचा काहीच संबंध नाही. जाणूनबुजून पाकिस्तानशी भारत या हल्ल्याचा संबंध जोडत आहे.
Pakistan Minister Attaullah Tarar raises concerns about a potential Indian Army strike within 36 hours.
Pakistan Minister Attaullah Tarar raises concerns about a potential Indian Army strike within 36 hours.Sarkarnama
Published on
Updated on

India Pakistan Tensions 2025: पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराला कारवाईसाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पंतप्रधान मोदींनी तिन्ही दलाच्या लष्कर प्रमुखांसह मंगळवारी बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला. पराराष्ट्र मंत्रालयाकडून अनेक देशांच्या विदेश मंत्र्यांशी संपर्क साधून हल्ल्याविषयी माहिती देण्यात आली. भारताच्या या अ‍ॅक्शनमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकींतर मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी पत्रकार परिषद घेत येत्या 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तावर हल्ला करणार असल्याची विश्वसनीय माहिती आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. ही माहिती विश्वसनीय गुप्त सुत्रांकडून मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Pakistan Minister Attaullah Tarar raises concerns about a potential Indian Army strike within 36 hours.
Pahalgam Attack Conspiracy : पहलगाम हल्ला मोदी-शहांचा कट म्हणणाऱ्या आमदारासह 27 जणांना अटक

तरार यांनी म्हटले की, पाकिस्तान हा स्वतःच दहशतवादाचा शिकार झालेला आहे. त्यामुळे जगात कोठेही दहशतवादी हल्ला झाला तरी पाकिस्तान त्याचा निषेध करतो. पहलगाम हल्लामध्ये पाकिस्तानाचा काहीच संबंध नाही.

जाणूनबुजून पाकिस्तानशी भारत या हल्ल्याचा संबंध जोडत आहे. या हल्ल्याची निष्पक्षपणे आणि तटस्थ चौकशी व्हावी म्हणून आम्ही भारताता प्रस्ताव दिल्याचेही तरार यांनी सांगितले. भारताने हल्ला केला तर आम्ही देखील प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे तरार यांनी म्हटले.

युद्धासाठी भारत जबाबदार

तरार यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून म्हटले की, या युद्धासाठी संपूर्णपणे भारत जबाबदार असेल. भारतीय लष्कराने कारवाई केल्यास त्यांना परिणाम भोगावे लागतील. प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान लष्कर देखील सज्ज असल्याचे तरार यांनी म्हटले. तसेच युद्धानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी भारताची असेल असे देखील तरार यांनी म्हटले.

Pakistan Minister Attaullah Tarar raises concerns about a potential Indian Army strike within 36 hours.
Raghuji Bhosale Sword : CM फडणवीसांची ऐतिहासिक कामगिरी, भोसले घराण्याची तलवार लंडनहून महाराष्ट्रात आणणार; लिलावात तब्बल 47 लाख मोजले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com