'प्लॅन बी’ ठरला; न्यायालयाच्या दणक्यानंतरही इम्रान खान मोठं पाऊल उचलणार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेली संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केल्यानंतर देशात राजकीय वातावरण अस्थिर बनले आहे.
PM Imran Khan
PM Imran KhanSarkarnama
Published on
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेली संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केल्यानंतर देशात राजकीय वातावरण अस्थिर बनले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरूवारी रात्री अविश्वास ठारव फेटाळण्याचा संसदेचा निर्णय रद्द करत त्यावर मतदान घेण्याच आदेश दिले आहेत. शनिवारी या ठरावावर मतदान होणार असल्याने इम्रान खान पुन्हा अडचणीत आले आहेत. पण विरोधकांचे मनसुबे होऊ नयेत, म्हणून त्यांनी प्लॅन बी तयार ठेवला आहे. (Imran Khan News Update)

इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठराव रविवारी संसदेनं (Parliament) फेटाळून लावला होता. हा ठराव घटनाबाह्य असल्याचे सांगत संसदेच्या उपसभापतींनी ठराव फेटाळून लावला. पण त्याआधीच संसदेत येण्याऐवजी इम्रान खान हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेल होते. यावेळी त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रपती (President) आरिफ अल्वी यांनी ही शिफारस मान्य करत संसद बरखास्त केली. यानंतर विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने उपसभापतींचा निर्णय रद्द करून ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवार मतदान होणार आहे.

PM Imran Khan
भाजपचा विधान परिषदेतही दबदबा; सात जागांवर उमेदवारांचा विजय

पण या मतदानाला सामोरे जाण्यास इम्रान खान तयार नसल्याचे समजते. आता त्यांनी मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय़ घेतला असून सायंकाळी पाकिस्तानात पुन्हा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहे. त्यानंतर मात्र, विरोधकांच्या हातात काहीच उरणार नाही, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. इम्रान यांच्यासह त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विविध प्रांतांमधील आमदारही राजीनामा देऊ शकतात.

सर्व खासदारांनीच राजीनामा दिल्यानंतर सरकार आपोआप कोसळणार आहे. त्यामुळे संसदेत ठरावावर मतदानाचा प्रश्नच उरत नाही. आपल्या पक्षाला सोडून गेलेल्या खासदारांवरही इम्रान खान यांच्याकडून अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. शुक्रवारी सायंकाळीच हे राजीनामे दिले जाऊ शकतात. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय कोंडी निर्माण होणार आहे. विरोधकांना कोणत्याही स्थितीत सत्तेत येऊ न देण्यासाठी हे पाऊल उचले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर इम्रान खान रात्री दहा वाजता देशवासियांशी संवाद साधू शकतात.

PM Imran Khan
मनसेला मोठा धक्का; राज्यातील पहिल्या नगराध्यक्षांना एकनाथ शिंदेंनी ठरवलं अपात्र

संसद बरखास्तीनंतर काय म्हणाले होते इम्रान खान?

संसदेत विश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर इम्रान यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, कोण खरं कोण खोटं याचा निर्णय आता जनतेनं घ्यावा, मी राष्ट्रपतींची भेट घेऊन संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. माझ्या विरोधात परदेशातून षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी अनेकांनी पैसे घेतले. त्यामुळे आता याचा निर्णय जनताच घेईल. जनतेसमोरच याचा निर्णय होईल, असं इम्रान खान यांनी स्पष्ट केलं. जनतेने आता सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार राहावं, असं आवाहनही इम्रान यांनी जनतेला केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com