'अच्छे दिन'चं वारं पाकिस्तानातही; माजी पंतप्रधानांच्या मुलीचे सुचक संकेत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी विरोधकांनी चांगला जोर लावला आहे.
Maryam Nawaz Sharif
Maryam Nawaz SharifSarkarnama
Published on
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी विरोधकांनी चांगला जोर लावला आहे. त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार असून विरोधकांनी आपल्या बाजूने 174 खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यातच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम (Maryam Nawaz Sharif) यांनी आता अच्छे दिन येणार, असं म्हणत सुचक संकेत दिले आहेत. (Imran Khan News Update)

इम्रान खान यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्यासाठी काही मिनिटांचाच कालावधी उरलेला आहे. त्याआधी मरियम यांनी सुचक ट्विट केलं आहे. 'आता अच्छे दिन येणार. लक्षात ठेवा, संसदेत (Parliament) हल्ला झाला होता, आज हीच संसदेत तुम्हाला घरी पाठवले,' असं मरियम यांनी म्हटलं आहे. मरियम यांच्या या ट्विटला मोठा आधार आहे. कारण सकाळी विरोधकांच्या झालेल्या बैठकीत 177 खासदार उपस्थित होते, असा दावा केला जात आहे. तर विरोधकांनी 174 खासदारांची यादीच प्रसिध्द केली आहे.

Maryam Nawaz Sharif
इम्रान खान यांना अटक होणार; गृहमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर रविवारी मतदान होणार आहे. पण परीक्षेला सामोरे जाताना त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. विरोधकांनी काही तास आधीच संसदेच्या अध्यक्षांविरोधातही अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर सुमारे 100 हून अधिक खासदारांनी सह्या केल्या आहेत. त्यातच गृहमंत्री शेख रशीद यांनी पंतप्रधानांच्या अटकेची भीती व्यक्त केली आहे.

सत्ता मिळवण्यासाठी इम्रान खान यांना 172 चा आकडा गाठवा लागणार आहे. त्यामुळे इम्रान खान दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. इम्रान खान यांनी सत्ता टिकवण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. मित्रपक्षांना खूश करण्यासाठी विविध पदं दिली जात आहेत. तर विरोधी खासदारांना गळाला लावण्याचाही प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचे हे प्रयत्न सध्यातरी सफल होताना दिसत नाहीत. कारण विश्वासदर्शक ठराव मांडताना त्याबाजूने 161 खासदांनी मतदान केलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चर्चेला आला आहे.

असं असेल गणित...

संसदेतील एकूण खासदार - 342

विरोधी पक्षांची ताकद -

पीएमएलएन - 84

पीपीपी - 56

एएनपी - 1

एमएमए - 14

बीएनपी - 4

बीएपी - 4

एमक्यूएम - 6

इतर - 5

एकूण - 174

इम्रान खान सरकारकडील खासदार -

पीटीआय - 155

पीएमएलक्यू - 4

बीएपी - 1

जीडीए - 3

एमएमएल - 1

इतर - 4

एकूण - 168

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com