Panchkula News: धक्कादायक: पंचकूला येथे एकाच परिवारातील 7 जणांनी जीवन संपवलं! दिल्लीतील बुराडी मृत्यू प्रकरणाची आठवण

कर्जबाजारी झाल्यामुळे एकाच परिवारातील सातही जणांनी हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती आहे. विष पाशन करुन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
Crime news
Crime newsSarkarnama
Published on
Updated on

पंचकूला:हरियाणा येथील पंचकूलामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एकाच परिवारातील सात जणांनी विष पाशन करुन आत्महत्या केली आहे. देहरादून येथील हा परिवार असल्याची माहिती समोर येत आहे.

सातही जणांचे मृतदेह पंचकूला सेक्टर-27 येथे एका कारमध्ये आढळले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे एकाच परिवारातील सातही जणांनी हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती आहे.

2018 मध्ये दिल्लीतील बुराडी परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. एकाच परिवारातील 11 जणांनी आपलं जीवन संपवलं होते. बुराडी येथील घटनेत 10 जणांनी गळफास घेतला होता, तर एका महिलेचे मृतदेह दुसऱ्या खोलीत जमिनीवर पडलेला आढळला होता. या घटनेमुळे उत्तर दिल्ली हादरली होती.

Crime news
Midnight Shootout: मध्यरात्री रंगला एन्काऊंटरचा थरार! पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा

पंचकूला येथील पोलिस घटना स्थळी पोहचले आहेत. मृताची ओळख पटली असल्याचे पोलिस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांनी सांगितले. देहरादून येथील निवासी प्रवीण मित्तल (वय ४२) आपल्या परिवारासह पंचकूला येथे आयोजित बागेश्वर धाम येथे हनुमत कथा कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Crime news
लालूंच्या विवाहित पुत्राचे 12 वर्षांपासूनचे अफेअर उघड: पक्ष अन् परिवाराला अडचणीत आणणारे तेजप्रताप यादव

कार्यक्रमानंतर ते देहरादून येथे परत येताना त्यांनी हे पाऊल उचललं. प्रवीण, त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कारमध्ये सूसाईट नोट आढळली आहे. मृतदेह एका खासगी हॉस्पीटलच्या शवगृहात ठेवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com