Kasba Peth Assembly Constituency News : काँग्रेसचं ठरलं ; कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी घोषणा..

Kasba Peth Assembly Constituency News : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

Kasba Peth Assembly Constituency News : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा ( Kasba Peth Assembly Constituency) पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविली जाणार आहे. (Kasba Peth Assembly Constituency News update)

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी गुरुवारी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे.

"कोल्हापूर, सोलापूर,अंधेरी येथील निवडणुकांमध्ये भाजपने उमेदवार दिला.त्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी सुरू केली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीची तयारी शहर काँग्रेसने सुरू केली आहे," असे अरविंद शिंदे यांनी माध्यमांना सांगितले. "काँग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडणूक लढविणार असल्यामुळे ही निवडणूक गाजेल," असे शिंदे म्हणाले.

"उमेदवारीचे तिकीट कुणाला द्यायचे, यांची काँग्रेसमध्ये एक पद्धत आहे. इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आले आहे. लवकरच प्रदेश कमिटीकडून या नावाची घोषणा करण्यात येणार आहे, प्रदेश कमिटीकडून जी फायनल यादी येणार आणि तीच व्यक्ती निवडणूक लढवणार आहे," असे शिंदे यांनी स्पष्ट केलं.

BJP, Congress
Pune By-Election: मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

कसब्यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांना रोखण्याचे आव्हानही भाजपपुढे आहे. दिवंगत आमदार टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे.

BJP, Congress
Abdul Sattar News :..म्हणून मी बारामतीला आलो ; पवारांविषयी अब्दुल सत्तार म्हणाले...

यापूर्वी भाजपने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवली असल्याचा दाखला ही दिला जात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. तर शिवसेनेनेही कसब्यावर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीतही कुरबुरी होण्याची शक्यता आहे.

निवडणूक बिनविरोध करावी, असा मतप्रवाह असला तरी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे हे प्रबळ दावेदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वरदा बापट वगळता तिघे उमेदवारीसाठी इच्छुक होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com