Lok Sabha Security Breach : आरोपी आता घडाघडा बोलणार; दिल्ली पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

Delhi Police : दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
Lok Sabha Security Breach
Lok Sabha Security Breach Sarkarnama
Published on
Updated on

Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी महत्वाचं पाऊल टाकलं आहे. पोलिसांच्या विशेष सेलने पटियाला हाऊस कोर्टाकडे त्यासाठी परवानगी मागितली आहे. पोलिसांनी गुरूवारी दाखल केलेल्या अर्जावर दोन जानेवारीला सुनावणी होणार आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरू असताना १३ डिसेंबरला लोकसभेत (Lok Sabha) दोन युवकांनी घुसखोरी केली होती. त्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्वजण कोठडीत आहेत. दिल्ली पोलिसांसह (Delhi Police) इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Lok Sabha Security Breach
Revanth Reddy Vs KCR : मुख्यमंत्र्यांकडूनच केसीआर यांची पोलखोल; नव्याकोऱ्या 22 लँड क्रूझर गाड्या लपवल्या

तरुणांनी घुसखोरी का केली, यामागे नक्षलवादी किंवा दहशतवादी संघटनांचा काही सहभाग आहे का, याअनुषंगाने तपास यंत्रणांची चौकशी सुरू आहे. त्यानुसार आता सर्व आरोपींची पॉलिग्राफ चाचणीसाठी परवानगी मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. हरदीप कौर यांच्यासमोर दोन जानेवारीला त्यावर सुनावणी होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पॉलिग्राफ चाचणी म्हणजे काय?

एखादी व्यक्ती किंवा आरोपी खोटं बोलत असेल तर पॉलिग्राफ चाचणीमध्ये त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये होत असलेले बदल टिपले जातात. त्यासाठी एका मशिनचा आधार घेतला जातो. काही प्रश्न विचारल्यानंतर मशिनच्या स्क्रीनवर मानवी हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडी यांचं निरीक्षण केले जाते.  त्यामध्ये संबंधित व्यक्ती खरं की खोटं बोलत आहे, याची खातरजमा केली जाते. 

Lok Sabha Security Breach
Captain Vijaykanth : राजकारणातील ‘कॅप्टन’ला कोरोनाने हरवलं; विजयकांत यांचं निधन

व्यक्तीने दिलेली माहिती शंभर टक्के खरीच आहे, याबाबतही अनेकदा साशंकता व्यक्त केली जाते. त्यासाठी विविध प्रश्नांवर दिलेल्या उत्तरांची सांगड घालावी लागते. त्यातून मग पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाते. यापूर्वीही अनेकदा महत्वाच्या गुन्ह्यांमधील आरोपींची अशी चाचणी करण्यात आली आहे.

Lok Sabha Security Breach
BJP News: मला पक्षातून काढलं तर भष्ट्राचाराचा भांडाफोड करणार; भाजप आमदाराने पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com