Parliament Security Breach: संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न; एकाला अटक

Parliament Security news update: रेल्वे भवन येथून संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. आज पहाटे त्याला सुरक्षारक्षकाने पकडले. त्याने संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.
Parliament
ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Parliament Security Breach: संसद भवनाच्या सुरक्षेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा त्रूट राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.

संसद भवनाच्या सीमाभिंतीवरुन एक व्यक्ती आत शिरली. गरुड प्रवेशव्दारापर्यंत तो आला होता. त्याला तेथील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे.

तो संसदभवन जवळीस झाडावरुन तो आत आला असल्याची माहिती आहे. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. कालच (शुक्रवारी) संसद भवनाच्या अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.

या व्यक्तीने रेल्वे भवन येथून संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता. आज पहाटे त्याला सुरक्षारक्षकाने पकडले. त्याने संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

संसदेवर 2001 मध्ये करण्यात आलेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणदिनीच म्हणजे 14 डिसेंबर 2023 रोजी सहा जणांनी नवीन संसद भवनाची सुरक्षा भेदल्याने देशभरात खळबळ उडाली होती.

अत्यंत नाट्यमयरीत्या थेट लोकसभेत घुसखोरी केलेल्या दोन तरुणांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहामध्ये उडी मारली, त्यांनी घोषणाबाजी करीत पिवळ्या रंगाच्या धुराची नळकांडी फोडल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

  • संसदेत तीन ते चार सुरक्षा चक्रे असतात.

  • संसदेच्या बाहेर दिल्ली पोलिस असतात.

  • आतल्या बाजूला सर्वांत बाहेर निमलष्करी दलाचे जवान असतात.

  • अधिवेशनकाळात गुप्तचर विभागाचे (आयबी) साध्या वेशातील अधिकारी व कर्मचारीही संसद परिसरात सतत वावरत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com