Lok Sabha Security Breach : क्या हुआ, गिर गया... पकडो पकडो पकडो! लोकसभेत घुसखोरी झाली अन्...

Major Security Breach inside Lok Sabha : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अघटित घडले.
Lok Sabha
Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

Parliament Security Breach : दुपारी एक वाजण्याची वेळ... लोकसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असते... विरोधकही शांत होते. जेवणाच्या सुट्टी वेळ जवळ आल्याने सदस्यही कमी होते. पश्चिम बंगालमधील खासदार खगेन मुर्मु हे बोलत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. प्रेक्षागृहातून काही जणांनी थेट सभागृहात उड्या घेतल्याने गोंधळ उडाला. क्या हुआ, गिर गया... पकडो पकडो पकडो! असा आवाज झाला आणि खासदारांची धावपळ उडाली.

संसदेचे (Parliament) हिवाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अघटित घडले. लोकसभेचे (Lok Sabha) सुरक्षाकवच भेदत तिघांनी थेट सभागृहात उडी घेतल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. या दोन तरुणांनी उड्या घेतल्याने धूरही पसरला. त्यामुळे खासदारांमध्ये खळबळ उडाली. नेमके काय घडले, हे कुणालाच कळत नव्हते.

Lok Sabha
Parliament Security Breach : घुसखोरांनी बुटातून आणले स्मोक कँडल! पीठासीन अध्यक्षांनीच सांगितली आपबीती

सभागृहात तिघांनी उड्या घेतल्याचे पाहून सुरक्षारक्षक तातडीने दाखल झाले. तिघांना तातडीने पकडण्यात आले. त्याआधी त्यांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रेक्षागृहातून दोघांनी उड्या मारल्यानंतर पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनाही काय सुरू हे कळाले नाही. क्या हुआ, कोई गिर गया... अशी विचारणा करेपर्यंत सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी काही सेकंदातच सभागृहाच कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित केले.

(Edited By - Rajanand More)

Lok Sabha
Parliament Attack 2001 : संसदेत २२ वर्षांपूर्वी काय घडले होते ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com