Ratan Tata Threat Call : रतन टाटांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीपर्यंत पोहचूनही पोलिसांनी अटक केलं नाही..

Ratan Tata Threat Call : रतन टाटांची सुरक्षा वाढवा नाहीतर...
Ratan Tata Threat Call :
Ratan Tata Threat Call :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशातील मोठे उद्योगपती टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलिसांना शोध घेतला आहे. पोलिस तपासामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तिला स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रासले आहे. (Latest Marathi News)

Ratan Tata Threat Call :
NCP Crisis: मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष काकाचा की पुतण्याचा ? लेखी सबमिशन सादर करण्याचा शेवटचा दिवस

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, 'धमकी देणाऱ्याने रतन टाटा यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले. जर टाटांची सुरक्षा वाढवली नाही तर त्यांची अवस्था टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्यासारखेच होईल, असा धमकी देण्याऱ्याने फोनवरुन सांगितले.

प्रसिद्ध उद्योगपती सायरन मिस्त्री यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला होता. धमकीचा कॉल रिसिव्ह होताच मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये आले आणि एका स्पेशल टीमला रतन टाटा यांच्या वैयक्तिक सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली, तर दुसऱ्या टीमला धमकी देण्याऱ्या कॉलरची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले. तांत्रिक साहाय्यकांच्या मदतीने कॉलरचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

धमकी देणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकातील असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. पोलिस त्याच्या पुण्यातील घरी पोहोचताच त्यांना फोन करणारा गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार भोसरी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. धमकीचा फोन करणाऱ्याच्या कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळले की तो व्यक्ती स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त आहे.

Ratan Tata Threat Call :
Dharavi Slum News : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीवरून राजकारण तापलं; अदानी अन् ठाकरे आमने-सामने!

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून रतन टाटा यांना त्या व्यक्तीने धमकी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. धमकी देणारा स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असल्याने पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com