Mahua Moitra : मला बसवण्याच्या नादात तुमचे 63 खासदार कायमचे बसले! महुआ मोइत्रा गरजल्या...

Parliament Session 2024 Lok Sabha President Speech debate : मागील वर्षी महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाली होती. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सोमवारी त्यांचे लोकसभेत पहिलेच भाषण झाले.
Mahua Moitra in Lok Sabha
Mahua Moitra in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेची खासदारकी रद्द झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यांनंतर त्यांनी लोकसभेत पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी भाजप व केंद सरकारवर सडकून टीका केली. मागील वर्षी ‘पैशांच्या बदल्यात प्रश्न’ या प्रकरणात खासदारकी गेली होती.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महुआ म्हणाल्या, मागीलवेळी मी बोलण्यासाठी उभी राहिले, त्यावेळी बोलू दिले नाही. पण सत्ताधारी पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांच्या 63 खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवले. त्यांचा आकडा 303 वरून 240 पर्यंत खाली आला.

Mahua Moitra in Lok Sabha
Parliament Session Live : गडकरींचे नाव घेत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; काय घडलं लोकसभेत?

भाजपला बहुमत मिळालेले नाही, बहुमतासाठी 32 चा आकडा कमी आहे. भाजप अनेक पक्षांचा आधार घेत सत्तेत आले आहे. यावेळी आम्ही 234 योध्दे आहोत. त्यामुळे यावेळी आम्हाला तुम्ही गप्प बसवू शकत नाही, अशा शब्दांत महुआ यांनी विरोधकांची ताकद दाखवून दिली. दरम्यान, महुआ मोइत्रा भाषणासाठी उभ्या राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहातून बाहेर जाऊ लागले.

महुआंनी त्यांना सभागृहात थांबण्याची विनंती केली. आदरणीय पंतप्रधान सर तुम्ही एक तास इथे होतो, माझे म्हणणेही ऐकून जा. घाबरू नका. तुम्ही माझ्या मतदारसंघात दोनदा प्रचारासाठी आला होता. आजतरी ऐकून जा, असे महुआ म्हणाल्या.

Mahua Moitra in Lok Sabha
Parliament Session Live : राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणाने हंगामा; मोदींनाही उभं राहावं लागलं...

महुआ यांच्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारवर आसुड ओढले. अयोध्येतील पराभव, महागाई, अग्निवीर, नीट यांसह विविध मुद्यांवर त्यांनी त्यांनी सरकारला घेरले. त्यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले होते. मोठ्या गदारोळ त्यांनी आपले भाषण केले. यादरम्यान पंतप्रधानही दोनदा उभे राहिले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com