PM Narendra Modi : बालकबुध्दी... तुम से नही हो पायेगा! मोदींकडून राहुल गांधींवर कारवाईचे संकेत

Parliament Session Live Lok Sabha Session President Speech Debate : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांच्या भाषणावरून राहुल गांधी यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी राहुल यांचे नाव न घेता त्यांना बालबुध्दी म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केले.

नरेंद्र मोदींनी राहुल यांच्या सडकून टीका केली. ते म्हणाले, संसदेत काल बालबुध्दीचा खेळ पाहायला मिळाला. ही बालबुध्दी कधी मिठी मारते, तर कधी संसदेत डोळा मारते. काल जे झाले ते गंभीरपणे घेतल्याशिवाय संसदीय मुल्यांचे आपण रक्षण करू शकत नाही. याला बालबुध्दी म्हणत दुर्लक्ष करू नये. कारण यामागे त्यांचा हेतू चांगला नाही, धोकादायक हेतू आहेत, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर कारवाई करण्याबाबत एकप्रकारे आवाहन केले आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi
Narendra Modi : नरेंद्र मोदींना झाली 'शोले'तील मावशीची आठवण; राहुल गांधींना डिवचलं, 'डायलॉग' एकदा ऐकाच...

देशात काल खटाखट दिवस साजरा करण्यात आला. बँक खात्यात 8500 रुपये आले की नाही हे लोक पाहत आहेत. संसदेत काल अग्निवीरवरून खोटे बोलण्यात आले. काल इथे खूप खोटे बोलण्यात आले. संविधानाच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यात आला. हा देशातील महापुरुषांचा अपमान आहे, अशी टीका मोदींनी केली.

Rahul Gandhi, Narendra Modi
Video Lok Sabha Session : लोकसभा बनली आंदोलनाचा आखाडा; मोदी अन् विरोधकही थांबेनात... पाहा व्हिडिओ

हिंदू सहनशील आहे. यामुळेच भारताची लोकशाही, विविधता, विराटता त्यामुळे वाढत आहे. पण आज हिंदूवर खोटे आरोप करण्याचे षडयंत्र केले जात आहे. काल असे म्हटले गेले की, हिंदू हिंसक असतात. हे आपले चरित्र्य आहे का, हे आपले विचार आहेत का. हा देश अनेक वर्षे याला विसरणार नाही, असा जोरदार हल्लाबोल मोदींनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com