Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Video Udayanraje Bhosale: संसदेच्या नवीन सभागृहात उदयनराजेंची 'जय शिवराय'ची घोषणा...

Parliament special session Satara bjp mp Udayanraje Bhosale:छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांनी मराठीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

Satara News: साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ पूर्ण केल्यानंतर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय..असे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी संविधान हातात घेत मराठीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी म्हटलेले 'जय शिवराय' हे विशेष लक्षवेधी ठरले आहे.

नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांना (काल)सोमवारपासून खासदारकीची शपथ देण्यात येत आहे. आज सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांनी मराठीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी मी उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले शपथ घेतो की...अशी सुरवात केली. त्यानंतर शपथ पूर्ण झाल्यावर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र..जय शिवराय असे म्हणाले.

Udayanraje Bhosale
Maan News: मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झालाय, आता विधानसभेत दाढीवाल्याचा होणार!

सातारा लोकसभा मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा तब्बल ३२ हजार १७७ मतांनी पराभव केला. सुरवातीला शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहिले होते. पण, १४ व्या फेरीनंतर शशिकांत शिंदे पिछाडीवर पडून उदयनराजेंनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. मोदींच्या सभेचा करिष्मा साताऱ्यात झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Udayanraje Bhosale
Sanjay Dina Patil: 18 व्या लोकसभेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनाला संजय दिना पाटलांचा लुक जुनाच

संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला महाराष्ट्रातील शिंदे गट, अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गटांच्या खासदारांनी शपथ घेतली. यावेळी नीलेश लंकेंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नीलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानं लोकसभेत चर्चेचा विषय बनला. खासदरकीची शपथ घेतल्यानं लंकेंनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com