Maan News: मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झालाय, आता विधानसभेत दाढीवाल्याचा होणार!

Shekhar Gore attack on Jayakumar Gore Maan Assembly Election:आम्ही मिशा, दाढी ठेवू नाही तर काढू पण, जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आम्हीच पाणी पाजलंय. आता विधानसभेलाही जनतेच्या आशीर्वादावर तुमचा कार्यक्रमच करण्यासाठी तयार आहे
Shekhar Gore attack on Jayakumar Gore
Shekhar Gore attack on Jayakumar GoreSarkarnama

Maan Politics : लोकसभा निवडणुकीत माणच्या जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन॒ विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा.जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची.

मतदारसंघात जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतली आहे, असा सूचक इशारा जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी दिला आहे.

शेखर गोरे यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा (man assembly election) ठेका घेतल्यासारखं वागू नये. लोकशाहीत सर्वांना समान हक्क आहे. त्यामुळे कोण गाठीभेटी घेईल, कार्यक्रमाना उपस्थिती दाखवेल, निवडणूका लढवेल हे ज्याच्या त्याच्या मर्जीने करेल.

माण-खटाव मतदारसंघात विधानसभा निवडणूक कोण लढवणार ते महाविकास आघाडी व आमच आम्ही बघू. महायुतीच्या सर्व्हेत आपलीच उमेदवारी राहतेय की नाही शंका आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळतेय का ते बघा. आम्ही मिशा, दाढी ठेवू नाही तर काढू पण, जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आम्हीच पाणी पाजलंय. आता विधानसभेलाही जनतेच्या आशीर्वादावर तुमचा कार्यक्रमच करण्यासाठी तयार आहे.

Shekhar Gore attack on Jayakumar Gore
Sanjay Dina Patil: 18 व्या लोकसभेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनाला संजय दिना पाटलांचा लुक जुनाच

उन्हाळ्यात पाणीटंचाई काळात जनता पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करत होती. जनावरे चारा, पाण्यासाठी टाहो फोडत होती. जनतेने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेय. मग तुमची जबाबदारी काय होती. आम्ही विरोधकच आहोत, साडेचार वर्ष कुठे होतो. यापेक्षा जनतेला ज्या ज्या वेळी गरज होती. त्यावेळी आम्हीच गावोगावी वाड्यावस्त्यावर टँकरने मोफत पाणीपुरवठा करत होतो. त्यावेळी तुम्ही कुठ तोंड काळ करून गेला होता, असा सवाल ही त्यांनी केला आहे.

लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने लोकशाही मार्गाने लढवली. भाजपला समोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी पैशांचा बाजार केला. त्यांनी पैसे नसते वाटले तरी महाआघाडीचा उमेदवार अडीच ते तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झाला असता. तुमच्या हट्टापोटी व हुकुमशाही पध्दतीमुळे भाजपचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ हातचा गेला आहे, हे मान्य करा. खासदारकीच्या निवडणुकीत पण विजय आमचाच होणार, अशाच बोंबा मारत होते.

Shekhar Gore attack on Jayakumar Gore
Abhimanyu Pawar: आमदार अभिमन्यू पवार यांना का आली दिवंगत मेटे, फुंडकरांची आठवण..

कोणीही तगडा उमेदवार द्या. महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्यावर मग कशाला पाय लावून पळत होता, असा प्रश्न शेखर गोरेंनी उपस्थित केला आहे. आताही विधानसभा निवडणुकीला तगडा उमेदवार द्या, म्हणून बोंबा मारताय. काळजी करू नका यावेळी जनतेने अन महाविकास आघाडीने ठरवलंय तुमच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा ते. तुमचा कार्यक्रम होणार हे एवढच लक्षात ठेवा, असा इशाराही शेखर गोरे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com