Parliament Special Session Schedule: आज ऐतिहासिक दिवस! संसदेचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतर; 'असे' असणार दिवसाचे कामकाज

New Parliament Building : लोकसभा सभागृहाची रचना मोर, तर राज्यसभा सभागृहाची रचना कमळाच्या थीमवर
New Parliament
New Parliament Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन इमारतीत सुरुवात होणार आहे. नवीन संसद भवनात लोकसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी सव्वाएक वाजता, तर राज्यसभेचे सव्वादोन वाजता सुरू होईल. तत्पूर्वी, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड, पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. जुन्या संसदेत होणारे कामकाज आजपासून नव्या संसदेत होणार असल्याने या ऐतिहासिक दिवसाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. (Latest Political News)

असा असणार नव्या संसदेतील पहिला दिवस

- मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता जुन्या इमारतीत सर्व खासदारांचे फोटो सेशन होईल.

- सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताला २०४७ पर्यंत विकास राष्ट्र बनवण्याच्या संकल्पावर हा कार्यक्रम आहे.

- या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे संबोधित करतील.

- या कार्यक्रमात तीन विशेष खासदार आपली मते मांडतील.

- यानंतर दुपारी सव्वाएक वाजता नवीन संसद भवनाच्या लोकसभेत कामकाज सुरू होईल, तर राज्यसभेतील कामकाज दुपारी सव्वादोन वाजता सुरू होईल.

New Parliament
Women Reservation Bill : मोदी सरकारचा मोठा निर्णय! महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी

संसदेच्या नव्या इमारतीची गरज का ?

जुनी संसद भवन सुमारे शंभर वर्षे जुनी आहे. अशा स्थितीत गेल्या काही वर्षांत संसदीय कामकाज, त्यात काम करणारे लोक आणि भेट देणाऱ्यांची संख्या, अनेक पटींनी वाढली आहे. यामध्ये जागेची कमतरता आहे. याशिवाय गटार लाइन, वातानुकूलित यंत्रणा, अग्निशमन दल, सीसीटीव्ही, ऑडिओ-व्हिडिओ यंत्रणा आदी बाबींची दखल घेतली नव्हती. शिवाय त्यात आजच्या काळाप्रमाणे आवश्यक तंत्रज्ञानाचाही अभाव आहे. (Maharashtra Political News)

नवीन इमारत त्रिकोणी

संसदेची नवी इमारत त्रिकोणी आकारात बनवण्यात आली आहे. हा आकार भारतीय नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करते. ही इमारत ६५ हजार चौरस मीटरमध्ये बांधण्यात आलेली आहे. नवीन इमारतीमध्ये ८८८ आसन क्षमतेचे लोकसभेचे सभागृह आहे. याशिवाय ३८४ सदस्य बसतील, असे राज्यसभेचे सभागृह बांधलेले आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान लोकसभेत एक हजार २७२ लोक बसू शकतात.

संसदेची नवीन इमारत लोकशाही प्रक्रियेतील भारतीय नागरिकांचे स्थान चित्रित करते. इमारतीतील लोकसभा सभागृहाची रचना राष्ट्रीय पक्षी मोर, तर राज्यसभा सभागृहाची रचना राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर करण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

New Parliament
PM Modi In Old Parliament: जुन्या संसदेतील शेवटचे अधिवेशन; पंतप्रधान मोदींनी सांगितल्या कडू-गोड आठवणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com