Parliament Standing Committee : मंत्रालयांशी संबंधित 24 स्थायी समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीच्या सदस्यपदी काँग्रेस नेते राहुल गांधी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कोणत्याच समितीमध्ये स्थान मिळालेले नाही.
काँग्रेसला चार समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे. तर, 11 समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे.
काँग्रेस खासदार खासदार दिग्विजय सिंह यांना शिक्षण मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष तर चरणजित सिंह चन्नी यांना कृषी मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल यांना गृह मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष, तर ब्रिजलाल यांना कायदा आणि कार्मिक मंत्रालयाशी संबंधित समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
टीएमसी आणि डीएमकेला प्रत्येकी 2 समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तर जेडीयू आणि सपाला प्रत्येकी एका समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. राहुल गांधी सदस्य असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे अध्यक्ष भाजप खासदार राधामोहन सिंह यांच्याकडे असणार आहे.
शशी थरूर यांना परराष्ट्र मंत्रालयाशी संलग्न स्थायी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे, तर टीएमसी युसूफ पठाण यांना वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीचे सदस्य आणि आपचे खासदार हरभजन सिंग यांना शिक्षण मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीचे सदस्य करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) लोकसभेतील एकमेव खासदार सुनील तटकरे यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीचे तर शिवसेना (शिंदे गट) श्रीरंग बारणे हे ऊर्जाविषयक संसदीय समितीचे प्रमुख असतील. द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके) तिरुची शिवा आणि कनिमोझी हे उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण यावरील संसदीय समित्यांचे अध्यक्ष असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.