Lok Sabha Session 2024 : नामदेव किरसान यांच्या प्रश्नानंतर लोकसभेत गदारोळ; विरोधकांचे वॉकआऊट

Congress MP Namdeo Kirsan Parliament Winter Session MSP : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नामदेव किरसान यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला.
Namdeo Kirsan in Lok Sabha
Namdeo Kirsan in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी नरमाईची भूमिका घेतल्याने मंगळवारी लोकसभेचे कामकाज सुरळीत सुरू राहिले. कामकाज सुरू झाल्यानंतर विविध प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. काँग्रेसचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नामदेव किरसान यांनीही किमान आधारीभूत किंमत आणि पीक विमा योजनेवरून प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी केलेल्या विधानांवरून विरोधकांनी वॉकआऊट केले.

किरसान यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, सरकार 22 शेतपीकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करते. पण सध्याची एमएसपी खूपच कमी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी मिळेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. एमएसपीमध्ये वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे का, असा प्रश्न किरसान यांनी उपस्थित केला होता.

Namdeo Kirsan in Lok Sabha
Parliament Winter Session : लोकसभेत गडकरींचे आसन 58 वरून 4 क्रमांकावर, प्रियांका गांधी चौथ्या रांगेत; कुणाला कुठे मिळाली जागा?

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आला, याची माहिती किरसान यांनी मागितली होती. तसेच या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यांना अनेक अडचणी येतात. त्यासाठी कंपनीची प्रतिनिधी उपलब्ध नसतो. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नयेत, कोणत्याही आपत्तीने शेतीचे नुकसान झाले तर त्याचाही योजनेत समावेश व्हावा, अशी मागणी यामाध्यमातून किरसान यांनी केली.

त्यावर सुरूवातीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी उत्तर देण्यास सुरूवात केली. मुल्य आयोगाच्या शिफारशीनुसार एमएसपी निश्चित केली जाते. 2014 पासून 2024 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एमएसपी दोन ते तीनपट वाढवली आहे. विरोधकांनी केवळ नारे दिले. त्याशिवाय काहीच केले नाही. शेतकऱ्यांना लुटले. त्यावरून विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

Namdeo Kirsan in Lok Sabha
Akal Takht Decision : देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?

त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केंद्रीय कृषी मत्री शिवराजसिंह चौहान यांना बोलण्याची परवानगी दिली. चौहान यांनी थेट स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांवरच पलटवार केला. समोर बसलेल्यांनी हा आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यासही नकार दिला होता, असे ते म्हणाले.

चौहान यांनी विविध पिकांना देण्यात आलेल्या एमएसपी वाढीची माहिती देण्यास सुरूवात केली. त्यावरून विरोधकांना जोरदार गोंधळ घालत वॉक आऊट केले. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नकाळ थांबवला. काहीवेळात विरोधक पुन्हा लोकसभेत सभागृहात परत आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com