New Delhi : संसदेत विरोध पक्षच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र सुरूच आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी गुरुवारी लोकसभेतून आणखी तीन खासदारांना निलंबित करण्यात आले. सभागृहात गोंधळ घातल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला(Om Birla) यांनी या खासदारांवर कार्यवाही केली.
निलंबित खासदारांमध्ये डी के सुरेश, नकुल नाथ आणि दीपक बैज यांचा समावेश आहे. या तिघांना मिळून आता संसदेतून एकूण 146 खासदार आतापर्यंत निलंबित केले गेले आहेत. यामध्ये लोकसभेचे 112 आणि राज्यसभेच्या 34 खासदारांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदारांचे निलंबनसत्र 14 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. संसद सुरक्षाभंग प्रकरणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी उत्तर द्यावे अशी मागणी लावून धरल्यानंतर, हे निलंबनसत्र सुरू झाले. पहिल्याच दिवशी लोकसभेच्या 13 आणि राज्यभेच्या एका खासदारास निलंबित केलं गेलं. तर, 18 डिसेंबर रोजी एकूण 78 खासदारांना ज्यामध्ये लोकसभेचे 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांचा समावेश होता.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकाचवेळी एकाच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणावर खासदारांचे निलंबन झाले होते. यानंतर बुधवारी लोकसभेतून दोन खासदारांना आणि आता गुरुवारी तीन खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे विरोधी पक्षातील खासदार आता आक्रमक झाले आहेत. 'इंडिया आघाडी'च्या खासदारांनी एकत्र येत संसद भवन परिसरात मोर्चा काढला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे देखील सहभागी झाले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.