
New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. आघाडीकडून ईव्हीएमला दोष दिला जात आहे. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मंगळवारी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
संविधानावर चर्चेला शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीत मी आगळावेगळे चित्र पाहिले. आजपर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या. पण कुणीही प्रचारसभांमध्ये संविधान दाखवून मते मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. पण काँग्रेसने हा प्रयत्न केला.
संविधान विश्वास आहे, श्रध्दा आहे, तो सन्मानाचा मुद्दा आहे. प्रचारसभांमध्ये दाखवण्याचा नाही. लोकसभेत कुणाला कळाले नाही. त्याबाबत जागरुकता होती. पण महाराष्ट्रात सभांमध्ये संविधान दाखवण्याबरोबरच ते वाटण्यातही आले. पत्रकाराच्या हातातही आले. ते उघडून पाहिले तर कोरे होते. उद्देशिकाही नव्हती, असे शाह यांनी सांगितले.
मागील 75 वर्षांत संविधानाबाबत एवढा खोटेपणा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. आणि हे निवडणूक का हरले, या कारणाचा शोध घेत आहेत. मी सांगतो, कारण शोधू नका, समितीची गरज नाही. संविधान आणि आरक्षण-आरक्षण करत होते. लोकांना कळाले की, संविधान बनावट घेऊन फिरत आहेत. म्हणून लोकांनी त्यांना हरवल्याचे शाह म्हणाले.
संविधानावरून काँग्रेसवर टीका करताना शाह म्हणाले, ‘पक्षाला एका कुटुंबाची खासगी संपत्ती समजता, संविधानालाही तसेच समजत होता. संविधानासोबत कसा विश्वासघात केला, हे आज या चर्चेच्या माध्यमातून देशाला समजत आहे.’ शाह यांनी आणबाणीवरूनही काँग्रेसवर टीका केली. तसेच काँग्रेसने घटनेत केलेल्या दुरुस्त्यांवरूनही त्यांनी निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.