Yogi Adityanath : पाकिस्तान नष्ट होणार की भारतात विलीन..! योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

Pakistan India : विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील भाजप नेत्यांकडून आदरांजली वाहिली जात आहे.
Yogi Adityanath on Partition
Yogi Adityanath on PartitionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानविषयी मोठा दावा केला आहे. विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी एकप्रकारे पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तान एकतर भारतात विलीन होईल किंवा नष्ट होईल, असे विधान योगींनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. फाळणीसाठी काँग्रेस कधीही माफी मागणार नाही. काँग्रेसला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली त्यांनी देशाचा गळा दाबला. त्यांच्या पापाला कधीही माफी दिली जाऊ शकत नाही. बांगलादेशात 1947 मध्ये 22 टक्के हिंदू होते. आज हा आकडा 7 टक्के उरला आहे. अखंड भारताचा स्वप्नच त्यावरील उपाय असल्याचे योगी म्हणाले.

Yogi Adityanath on Partition
Muhammad Yunus : हिंदूंवर हल्ले होत असताना मोहम्मद यूनुस पहिल्यांदाच गेले मंदिरात; म्हणाले...

1947 मध्ये जर भारताच्या राजकीय नेतृत्वाकडे मजबूत इच्छाशक्ती असेत तर जगातील कोणतीही ताकद अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. पण काँग्रेसच्या सत्तेच्या मोहाने देशाला बरबाद केले. त्यांच्याकडे सत्ता गेली, त्यावेळी त्यांनी देशाच्या बदल्यात राजकारण केल्याचा हल्ला योगींनी चढवला.

Yogi Adityanath on Partition
Partition Horrors Remembrance Day: पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; फाळणीच्या स्मृती जागवल्या...

पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्ष तिरंगा फडकावून जल्लोष करत असताना असंख्य लोक मातृभूमी सोडत होते, असेही योगी म्हणाले. मागील दहा वर्षातील भारताच्या प्रगतीचा गौरव करताना त्यांनी सांगितले, मागील दहा वर्षात भारताने केलेल्या प्रगतीमुळे जग अचंबित झाले आहे. त्यामुळे जगात कुठेही संकट आले तरी आता मदतीसाठी भारताकडे पाहिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com