
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी बिहारमध्ये 30 वर्षांपूर्वीचं प्रकरण उकरुन काढलं आहे. चारा गैरव्यवहारावरुन पुन्हा राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे.बिहार सरकार या प्रकरणातील दोषींकडून ही रक्कम वसुल करणार आहे. त्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री, आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासह चारा गैरव्यवहारातील आरोपींकडून 950 कोटी रुपये वसुल करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. यासाठी सरकार सीबीआय आणि आयकर विभागाचा सल्ला घेत आहे. त्यानंतर सरकार आरोपींच्या विरोधात कोर्टात धाव घेणार आहे.
लालू प्रसाद यादव यांच्यासह काही नेते, अधिकारी या प्रकरणात आरोपी आहेत. यात अनेक ठिकाणी खटले दाखल आहेत. विविध पाच खटल्यात लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं होतं. त्याच्याकडून किती पैसे वसुल करायचे याची आकडेमोड सुरु आहे. ही सर्व रक्कम पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.
चारा गैरव्यवहारातील आरोपीची संपत्ती जप्त करुन ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. सरकार पैशा पुन्हा सरकारकडे येणार असल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनी सांगितले. हा निर्णय सरकारचा नसून न्यायालयाचा निर्णय असल्याने त्यानुसार कारवाई केली जाईल. आरोपींच्या विरोधात कारवाई करा, असा स्पष्ट आदेश न्यायालयानं दिला आहे. त्यावर सरकार काम करीत आहे. या घटनेला आता 28 वर्ष झाली आहेत, या प्रकरणातील दोषींना कोर्टानं शिक्षाही केली आहे.
1990 मध्ये 940-950 कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता. त्यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे मु्ख्यमंत्री होते.
1996 मध्ये पाटना उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. एकूण 66 प्रकरणे यात दाखल करण्यात आले होते.
यात 170 जणांना आरोपी करण्यात आले. अनेकांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. लालू प्रसाद यादव यांना पाच प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती.
ते सात वेळा जेलमध्ये जाऊन आले आहेत. 3 आँक्टोबर 2013 रोजी लालू प्रसाद यादव यांना पहिल्यांदा शिक्षा सुनावण्यात आली होती.
माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, जगदीश शर्मा, आर.के. राणा यासारख्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.