राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधातील याचिका रद्द केली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama

कॉग्रेसनचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधातील याचिका रद्द केली आहे. राहुल गांधी यांनी मार्च २०१४ मध्ये हे भाषण केले होतं. त्यांच्याविरोधात राजेश कुंटे यांनी याचिका दाखल केली होती.

आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला असा असल्याचा दावा करत राहुल यांनी संबंधित भाषणाची प्रतही न्यायालयात सादर केली होती. मात्र, या भाषणाची प्रत दाखल करून राहुल यांनी स्वत:च्या विधानाला पुष्टी दिली आहे, असा दावा कुंटे यांनी केला. मात्र, भिवंडी येथील न्यायालयाने २०१८ मध्ये कुंटे यांची, भाषण हाच पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची मागणी फेटाळली. त्यानंतर कुंटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथेही ही याचिका रद्द करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
दिल्लीत सिध्दूंची मोहिम फत्ते; आणखी एका जवळच्या नेत्यावर मोठी जबाबदारी

महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कारणीभूत ठरविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भाषण त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या फौजदारी खटल्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

राजेश कुंटे यांनी केलेल्या याचिकेनुसार, राहुल यांनी भिवंडीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ‘रा. स्व. संघाच्या लोकांनी’ गांधीजींची हत्या केली, असे विधान केले होते. त्यांच्या या भाषणानंतर लगेचच कुंटे यांनी राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल करत एफआयआर दाखल करवून घेतली होती. त्याविरोधात राहुल यांनी डिसेंबर २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दिल्लीतील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांचे फोटो ट्विटरवर शेअर केल्यामुळ यापूर्वीही राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. (PIL against Rahul Gandhi) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पीडित मुली किंवा महिलेची ओळख गुप्त राखणं आवश्यक असतं. असं असतानाही राहुल गांधी यांनी दिल्लीतील पीडित मुलीच्या आई-वडिलांचे फोटो ट्विटरवर शेअर करून त्यांना अडचणीत आणलं आहे, असा आरोप म्हादलेकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com