दिल्लीत सिध्दूंची मोहिम फत्ते; आणखी एका जवळच्या नेत्यावर मोठी जबाबदारी

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळापासून अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे.
AmarinderSingh, Navjot Sidhu
AmarinderSingh, Navjot SidhuSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आणण्यात आले आहे. चन्नी हे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्या गोटातील मानले जातात. सिध्दूंनी मंगळवारी दिल्लीला जात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना आणखी एक धक्का दिला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू आहे. अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. चन्नी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा अद्याप शपथविधी झालेला नाही. मंत्रिमंडळामध्येही सिध्दू यांचंच वर्चस्व असू शकतं, अशी चर्चा आहे.

AmarinderSingh, Navjot Sidhu
नव्या मुख्यमंत्र्यांसह सिध्दू दिल्लीत; अमरिंदरसिंग यांना पुन्हा धक्का देण्याची तयारी

त्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री व सिध्दूंनी तातडीनं दिल्ली गाठली. पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी पंजाब काँग्रेसमधील पदांवर तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये आमदार परगत सिंग व काँग्रेसचे नेते योगिंदर पाल धिंग्रा यांना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले आहे. तर गुलजार इंदर चहल यांची खजिनदारपदी वर्णी लागली आहे.

AmarinderSingh, Navjot Sidhu
नव्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याची काही तासांतच सोनियांकडं मागणी

चन्नी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच ही नियुक्ती केली आहे. यामध्ये परगत सिंग हे सिध्दूंचे कट्टर समर्थक मानले जातात. अमरिंदरसिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी जणू विरोधी मोहिमच उघडली होती. परगत सिंग हे उघडपणे सरकारवर टीका करत होते. त्यामुळे त्यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवून काँग्रेसनं पुन्हा एकदा अमरिंदरसिंग यांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. आता प्रदेश काँग्रेसमध्येही सिध्दू यांचे वर्चस्व राहण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं अमरिंदरसिंग काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

AmarinderSingh, Navjot Sidhu
नव्या चन्नी सरकारचा रिमोट सिद्धूंच्याच हातात असणार

दरम्यान, अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो. नव्या चेहऱ्यांना संधी देताना सिध्दू यांच्या पारड्यात झुकतं माप टाकलं जाऊ शकतं. चन्नी हे स्वत: सिध्दू यांच्या गटातील मानले जात आहेत. पण तरीही अमरिंदरसिंग यांच्या जवळच्या नेत्यांमधील काहींना संधी दिली जाईल. अमरिंदरसिंग हे पंजाब काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यांना काँग्रेसकडून पूर्णपणे अडगळीत टाकणे राजकीयदृष्ट्या पक्षाला परवणारं नाही. त्यामुळं मंत्रिमंडळात त्यांच्या गटातील नेत्यांना बऱ्यापैकी स्थान मिळेल, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com