औरंगाबाद : हिजाब गर्ल बिबी मुस्कानच्या सत्काराचा कार्यक्रम रमजान ईद नंतर घेणार असल्याची माहिती वंचित बहुजन (Vanchit Bahujan Aghadi) आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद यांनी सोमवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. (Aurangabad) वंचित बहुजन आघाडीतर्फे १४ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता आमखास मैदानावर हिजाब गर्ल बिबी मुस्कानच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार होता. (Marathwada)
या कार्यक्रमासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर औरंगाबादेत दाखल झाले होते. मेळावा आणि सत्कार कार्यक्रमाची संपुर्ण तयारी देखील झाली होती. भाजपने हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्काराला विरोध दर्शवल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने नव्याने अर्ज करण्याची मुभा देत पोलिसांनाही तात्काळ सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. फारुक अहमद म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता कागदी वाघ झालेले आहेत. गरिबांना घरकुल मिळत नाही,आणि हे आमदारांसाठी घर देतात. त्यांना सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही.
राष्ट्रवादीचे दोन मंत्री सध्या कारागृहात आहेत. त्यावर शरद पवार गप्प का? असा सवाल ही फारूख अहमद यांनी यावेळी उपस्थित केला. पैगंबर मोहम्मद बील व बिबी मुस्कानसह महाविकास आघाडी, एमआयएम, उत्तरप्रदेशात झालेल्या निवडणूका, ईडी आदि विषयावर फारूख यांनी रोखठोक भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, अॅड. अफरोज मुल्ला, प्रभाकर बकले आदि उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.