दिवाळी होणार गोड! पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू महिन्यात 15 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता विमान इंधनापेक्षा (Aviation Turbine Fuel) पेट्रोल 33 टक्क्यांनी महागले आहे. या दरवाढीमुळे मोदी सरकारच्या विरोधात जनतेत रोष निर्माण झाला आहे. याची दखल घेत अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) इंधन दर कमी करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाशी (Petroleum Ministry) चर्चा सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने पेट्रोलियम मंत्रालय हे अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात आहे. पेट्रोल, डिझेलसह, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जनतेला इंधन दरवाढीच्या झळातून दिलासा कसा दिला जाऊ शकतो, यावर पेट्रोलियम मंत्रायलय अर्थ मंत्रालयाकडे विचारणा करीत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाची दर खाली आणण्याची इच्छा असली तरी अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयच घेईल. इंधनावरील काही प्रमाणात कमी करुन दर कमी केले जावेत, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने ठेवला आहे. यावर आता अर्थ मंत्रालय कोणता निर्णय घेते यावर इंधन दर स्वस्त होणे अवलंबून असणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 दिवस वाढ करण्यात आली आहे.

देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे.

Petrol and Diesel prices
तेलगीचं भूत पुन्हा बाहेर? महाराष्ट्र सरकार घेरणार सीबीआय संचालकांना

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग दोन दिवस कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.84 रुपये तर मुंबईत 111.77 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 94.57 रुपये आणि मुंबईत 102.52 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. चालू महिन्यात पेट्रोल, डिझेलची दरात 15 दिवस वाढ झाली आहे.

Petrol and Diesel prices
मुख्यमंत्र्यांनी महिन्यातच शब्द खरा करुन दाखवला अन् केली विजबिलांची होळी!

सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com