EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता पेन्शन अन् क्लेम सेटलमेंट होणार 'सुपरफास्ट'; सरकारचा नवा प्लॅन काय?

pf withdrawal and pension update India : PF खातेदारांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सरकार EPFO प्रणालीमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असून पेन्शन आणि PF क्लेम सेटलमेंट प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.
EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता पेन्शन अन् क्लेम सेटलमेंट होणार 'सुपरफास्ट'; सरकारचा नवा प्लॅन काय?
Published on
Updated on

पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने EPFO 3.0 अंतर्गत अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले असून आता पेन्शन, क्लेम सेटलमेंट आणि खाते ट्रान्सफर प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. या सुधारणा कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी केल्या जात आहेत.

केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, ईपीएफओ 3.0 मुळे संपूर्ण प्रणाली डिजिटल होत असून प्रक्रियेतला विलंब कमी केला जात आहे. विशेष म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून सर्व कार्यालयांमध्ये 'सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टिम' लागू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे दर महिन्याला 70 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना वेळेवर आणि अचूक पेन्शन मिळत आहे.

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता पेन्शन अन् क्लेम सेटलमेंट होणार 'सुपरफास्ट'; सरकारचा नवा प्लॅन काय?
Supreme Court judgment : 'त्या' सर्व महिलांना मातृत्व रजा मिळायलाच हवी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, लाखो महिलांना फायदा होणार!

सरकारने क्लेम सेटलमेंट प्रक्रियेतही मोठा बदल केला आहे. आता 5 लाख रुपयांपर्यंतचे क्लेम ऑटो मोडमध्ये जलदगतीने मंजूर केले जात आहेत. चालू आर्थिक वर्षात 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत 3.52 कोटींपेक्षा अधिक क्लेम्स ऑटो पद्धतीने निकाली काढण्यात आले आहेत. सुमारे 71.37% अॅडव्हान्स क्लेम्स आता ऑटो मोडमध्ये सेटल होत असून त्यासाठी 51,620 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.

नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया देखील आता सोपी करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत 70.54 लाखांहून अधिक ट्रान्सफर क्लेम्स आपोआप सुरू झाले आहेत. केवायसी पूर्ण असल्यास आता कर्मचारी किंवा नियोक्त्याची मंजुरी न घेता ट्रान्सफर पूर्ण होतो. तसेच 21.39 लाख कर्मचारी स्वतःही ट्रान्सफर क्लेम सादर करत आहेत.

ईपीएफओ 3.0 हा एक मोठा डिजिटल बदल प्रकल्प असून त्याचा उद्देश कागदपत्रांचा वापर कमी करणे, क्लेम प्रक्रिया वेगवान करणे आणि सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे हा आहे. कमी जोखमीचे क्लेम आता 3 दिवसांपेक्षा कमी वेळेत निकाली काढले जात आहेत, जे आधी 20 दिवसांपर्यंत लागायचे.

EPFO Update : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! आता पेन्शन अन् क्लेम सेटलमेंट होणार 'सुपरफास्ट'; सरकारचा नवा प्लॅन काय?
Ambadas Danve Threat News : अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी, 'सरकार गोळी मारण्याची वाट बघतंय का?' अनिल परब यांचा विधान परिषदेत सवाल!

दरम्यान, किमान पेन्शन वाढवण्याबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला असला तरी सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com