Ambadas Danve Threat News : अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी, 'सरकार गोळी मारण्याची वाट बघतंय का?' अनिल परब यांचा विधान परिषदेत सवाल!

Anil Parab statement on Ambadas Danve death threat news : शिवसेना नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी. विधान परिषदेत अनिल परब यांनी सरकारच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला.
Ambadas Danve Threat News : अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी, 'सरकार गोळी मारण्याची वाट बघतंय का?' अनिल परब यांचा विधान परिषदेत सवाल!
Published on
Updated on


Anil Parab On Threat Call News :
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका भाजपा कार्यकर्त्याने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. फाडून टाकू, कापून टाकू अशी भाषा आणि शिवीगाळ करत एक-दोन नव्हे तर सलग चार दिवस फोन केले. मग सरकार गोळी मारण्याची वाट बघतंय का? असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.

सरकार अशा लोकांना पोलीस संरक्षण देत आहे, जे आमदार, खासदार नाहीत किंवा त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. कंत्राटदार, वसुली करणारे आणि ज्यांना पैसे देऊन मार म्हटलं तरी कोणी मारणार नाही, असे लोक पोलीस बंदोबस्तात फिरतात. इकडे मात्र विधान परिषदेच्या माजी विरोधी पक्षालाच धमकी दिली जाते. हा गंभीर प्रकार आहे, याची दखल सरकार घेणार की नाही? या संदर्भात गृहमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणीही परब यांनी सभागृहात केली.

Ambadas Danve Threat News : अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी, 'सरकार गोळी मारण्याची वाट बघतंय का?' अनिल परब यांचा विधान परिषदेत सवाल!
SSC paper leak : धक्कादायक : थेट स्ट्राँग रूममधून दहावीच्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरला; शिक्षण विभागात मोठी खळबळ

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्ष नेते असताना सभागृहात अनेक गैरव्यवहार, भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली. राज्यभरातील विविध घोटाळ्यांचा भांडाफोड त्यांनी केला आहे. आताही सभागृहाबाहेर ते अनेक गोष्टी चव्हाट्यावर आणत आहेत. याचा जीवे मारण्याच्या धमकीशी काही संबंध आहे का? या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना कापून टाकू, फाडून टाकू, तुमच्या कुटुंबाला संपवू अशा धमक्या दिल्या जात आहेत का? याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी परब यांनी केली.

दरम्यान, अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी हा भाजपाचा कार्यकर्ता अमोल गोंदे हा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन सदस्य गायब केल्याच्या रागातून अंबादास दानवे यांनी भाजपाचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडून जाब विचारला होता.

Ambadas Danve Threat News : अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी, 'सरकार गोळी मारण्याची वाट बघतंय का?' अनिल परब यांचा विधान परिषदेत सवाल!
BJP leader murder : मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

या रागातून गायकवाड यांचा समर्थक असलेल्या अमोल गोंदे नावाच्या कार्यकर्त्याने अंबादास दानवे यांना फोन करून जाब विचारला होता. मी दानवे यांना धमकी दिली नाही, कापून टाकू, फाडून टाकू अशी भाषा वापरली नाही की शिवीगाळही केली नाही. माझ्याकडे काॅल रेकाॅर्ड आहे, पोलीसांनी मागीतल्यास आपण ते देऊ. विरोधी पक्ष नेता म्हणून असलेले पोलीस संरक्षण काढून घेतल्यामुळे ते पुन्हा मिळवण्यासाठी अंबादास दानेव यांनी स्टंटबाजी केल्याचा आरोप अमोल गोंदे याने केला होता.

दरम्यान, या प्रकरणात गृह राज्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करत या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीला अटक करून चौकशी केली जाईल. यात तथ्य आढळले तर दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com