Congress News : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा फोन 'हॅक'; चार नेत्यांकडे मागितली ४० लाखांची खंडणी, काय आहे प्रकरण ?

Phone Hack of Congress Leader : नेत्यांचे फोन हॅक होत असल्याने देशभरात खळबळ
Congress, Kamalnath
Congress, KamalnathSarkarnama
Published on
Updated on

Phone Hack of Big Congress Leader : महाराष्ट्रात काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यात शरद पवार, संजय राऊत, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांना धमकी मिळाली आहे. आता देशातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा फोन हॅक करण्याचा प्रकार समोर आला आहे. हॅक केल्यानंतर संबंधित फोनवरून चार नेत्यांकडे प्रत्येकी १० लाख रुपयांची खंडणीही मागितली. माजी मुख्यमंत्र्यांचा फोन हॅक करून त्याचा वापर खंडणीसाठी केल्याने देशाभर खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

Congress, Kamalnath
Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपमध्ये हलचालींना वेग; दोन दिवसात खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

मध्य प्रदेश माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस युनिटचे अध्यक्ष कमलनाथ यांचा मोबाईल हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कमलनाथ यांचा फोन हॅक केल्यानंतर त्याचा वापर खंडणी मागण्यासाठी केला. फोन हॅक करणाऱ्यांनी पक्षाच्या चार नेत्यांकडे प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार दोन चोरट्यांनी केल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्याने बुधवारी (ता. १२) दिली.

प्रवक्त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांचा मोबाईल फोन हॅक करण्यात आला आहे. यानंतर दोन जणांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून १० लाखांची खडंणी मागितली. पैशांसाठी ते आले असता त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ते दोघे गुजरातचे रहिवासी असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही अधिकृतपणे तक्रार दिली नसल्याची माहिती मिळत आहे.

Congress, Kamalnath
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपदावरून नाराज होऊन पहिला आमदार बाहेर पडणार? थेट शिंदे-फडणवीसांना दिला अल्टिमेटम..

मध्य प्रदेश काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले की, चोरट्यांनी कमलनाथ यांचा फोन हॅक केला. यानंतर त्या फोनचा वापर करून पक्षाचे आमदार सतीश सिकरवार, खजिनदार अशोक सिंग, काँग्रेसच्या इंदूर शहर युनिटचे अध्यक्ष सुरजित सिंग चढ्ढा आणि माजी कोषाध्यक्ष गोविंद गोयल यांच्याकडे पैशांची मागणी केली. या प्रकरणी गोयल आणि काही पदाधिकाऱ्यांनी कॉल डिटेल्सची तपासणी केली. त्यावेळी फसवणूक होत असल्याचे उघडकीस आली. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या कुठल्याही सदस्यांकडे पैसे मागितलेले नाहीत.

फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गोयल यांनी चोरट्यांना पकडण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी पैसे घेणाऱ्या तरुणांना आपल्या कार्यालयात बोलावले. ठरल्याप्रमाणे चोरटे गोयल यांच्या कार्यालयात पैसे नेण्यासाठी आले. त्यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी लवकरच रीतसर पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नसल्याची माहिती दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com