Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपमध्ये हलचालींना वेग; दोन दिवसात खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

Mantrimandal Vistar News : दिल्लीतील बैठकीनंतर आज मुंबईतही बैठक होणार
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Cabinet Expansion Maharashtra 2023 : राज्य सरकारमध्ये सहभागी होऊन ११ दिवस उलटले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खाते वाटप करण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल आणि केद्रींय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्यात बंददाराआड तासभर चर्चा झाली. यानंतर आज गुरुवारी (ता. १३) मुंबई येथे शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात चर्चा होणार आहे. दिल्ली आणि मुंबईतील या बैठकांत होणाऱ्या खलबत्यावरून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. (Latest Political News)

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Maharashtra Cabinet Expansion : कोण होणार मंत्री ? शिंदे-फडणवीसांच्या अनुपस्थितीत अजितदादा-शाह यांच्यात तासभर खलबतं..

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दि. २ जुलै रोजी राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावेळी पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अर्थमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. शिवसेनेतील आमादारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थमंत्रीपद देण्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून अमित शाह यांनी पवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. विशिष्ट खात्यासाठी अडून न राहता राज्याच्या हितासाठी काम करणे गरजेचे असल्याचे शाह यांनी पवारांना सांगितल्याचे समजते.

दरम्यान, खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने सत्ताधारी आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे पावासाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी तिनही पक्षांकडून जोरदार हलचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पवार यांनी शाह यांची भेट घेतल्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही बैठक होणार आहे. तत्पूर्वी शिंदे गटाचे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Palghar Nagar Parishad : पालघर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदेही अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आपला पक्ष शिवसेनेसाठी राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्याची सुरूवात ठाण्यातून आजपासूनच होणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसही भाजपच्या एका कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. दरम्यान, शिंदे-फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्याचीही शक्यता आहे.

आज एकीकडे तिन्ही पक्ष नेत्यांच्या बैठका आणि दुसरीकडे आपल्या पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी अशी आजची स्थिती आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शुक्रवार (ता. १४) काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपर्यंत दोन दिवसात खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com