पायलट, देवरांच्या नाराजीची चर्चा 

राजस्थानातील युवा नेते सचिन पायलट हेदेखील तेथील स्थानिक नेतृत्वावर नाराज असून ते कधीही बंडाचा झेंडा रोवू शकतात, अशी शक्यतावर्तविली जात आहे. मुंबई काँग्रेसचा युवा चेहरा असणाऱ्या मिलिंद देवरा यांची नाराजीही लपून राहिलेली नाही, त्यामुळे ते भाजपवासी झाले तर आश्‍चर्य वाटायला नको.
milind-devra-sachin-piolt
milind-devra-sachin-piolt
Published on
Updated on

भोपाळ : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षातील अन्य नेत्यांच्या संभाव्य वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली असून राज्यातील महाआघाडीचे चाणक्यदेखील सावध झाले आहेत. राजस्थानातील युवा नेते सचिन पायलट हेदेखील तेथील स्थानिक नेतृत्वावर नाराज असून ते कधीही बंडाचा झेंडा रोवू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई काँग्रेसचा युवा चेहरा असणाऱ्या मिलिंद देवरा यांची नाराजीही लपून राहिलेली नाही, त्यामुळे ते भाजपवासी झाले तर आश्‍चर्य वाटायला नको, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

दिल्लीमध्ये काँग्रेसची भाजपविरोधी तोफ म्हणूनच शिंदे ओळखले जात असत. तेरा दिवसांपूर्वी ते काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते, या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा दावा केला होता. आता त्याच शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

ज्योतिरादित्य यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघे शिंदे कुटुंब त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ज्योतिरादित्य यांचे चिरंजीव महाआर्यमन शिंदे यांनी वडिलांच्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो असे म्हटले आहे. परंपरेचा त्याग करण्यासाठी मोठे धाडस लागते. आमचे कुटुंब आणि आम्ही कधीच सत्तेसाठी हपालेलो नव्हतो, आश्‍वासन दिल्याप्रमाणे आम्ही देशात आणि मध्य प्रदेशात परिवर्तन आणून दाखवू असा दावाही महाआर्यमनने केला आहे. 

मंत्र्यांचे राजीनामे 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट बंडखोरीच्या तयारीत असल्याची कुणकुण कमलनाथ यांना आधीच लागली होती. शिंदे समर्थक आमदारांनीही आधीच बंगळूरला धाव घेतली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com