Sambhajiraje Chhatrapati News : भावी मुख्यमंत्री उल्लेखावर संभाजीराजे म्हणाले, "माझ्या मनात..."

Aurangjeb And Maharashtra : औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांना राज्यात राहण्याचा अधिकार नाही.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Sambhajiraje Chhatrapati Nashik Tour : संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्षाची स्थापन केल्यानंतर राज्याचे दौरे सुरू केले आहेत. संभाजीराजे रविवारी (ता. २५) नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठिकाणी त्यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला फलक लावला होता. यावर त्यांनी आपली भावना व्यक्त केली. संभाजीराजे यांनी यावेळी राज्यात औरंगजेबचे उद्दात्तीकरण होत असल्याने नाराजीही व्यक्त केली. (Latest Political News)

नाशिक दौऱ्यावर असलेल्‍या संभाजीराजे छत्रपती यांनी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांसी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना राज्यात राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात खडसावले. ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर पुरुषांसह महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. असे असताना राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रास देणाऱ्या व संभाजी राजांची हत्‍या केलेल्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण अशोभनीय आहे. जे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत, त्‍यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही."

Sambhajiraje Chhatrapati
Sharad Pawar told History of 1977: तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील..; 'त्या' टिकेनंतर शरद पवारांनी इतिहासच सांगितला

राज्यातील राजकारणाचा स्तर खालावल्याची खंतही संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, "सध्या राज्‍यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. महाडला जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या समाधीला वंदन केले. आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांची समाजाला खरी गरज आहे. परंतु या थोर पुरुषांचे आचार-विचार दुर्लक्षित होत आहेत. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. या सुरू असलेल्या राजकारणाची मला खंत वाटते."

Sambhajiraje Chhatrapati
BRS News : देश जिंकालयला निघालेल्या के. चंद्रशेखर राव यांना मोठा झटका; नेमकं काय झालं ?

'वेल ॲन्ड गुड'

यावेळी भावी मुख्यमंत्री म्हणून लावलेल्या फलकावरही संभाजीराजे यांना छेडण्यात आले. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत. याबाबत माझ्या मनात काहीही नाही. केवळ काम करत राहणार असेच ठरवले आहे. कार्यकर्ते या कामासाठी ताकद देत असतात. भावी मुख्यमंत्री म्‍हणवत माध्यमांकडूनही महत्त्व दिले जात आहे. कार्यकर्त्यांनी ‘वेल ॲन्ड गुड’ केले. या त्यांच्या भावना आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com