Congress RoadShow News: निवडणुकीपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत ; Video पाहा, रॅलीत उडवल्या पाचशेच्या नोटा...

DK Shivakumar video surfaces : काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने रॅलीत पाचशेच्या नोटा उधळल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
karnataka congress president d k shivakumar
karnataka congress president d k shivakumar Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Elections : रस्त्यावर कारमधून पैसे उडवताना आपण 'फर्जी'या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर याला पाहिले असेल, असाच प्रकार नुकताच घडला. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने रॅलीत पाचशेच्या नोटा उधळल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी मंगळवारी मंड्यातील रॅलीत सहभागी नागरिकांवर पाचशे रुपयांच्या नोटा उधळल्या. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर डीके शिवकुमार हे वादात सापडले आहे.

karnataka congress president d k shivakumar
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता प्राध्यापक, साहित्यिक मैदानात..

यापूर्वीही काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांना नालायक म्हटले होते. प्रवीण हे राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत असून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला होता. आपल्या पक्षाची सत्ता आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवकुमार यांनी त्यावर दिला होता.

हा व्हिडिओ मंड्या जिल्ह्यातील रॅलीतील आहे. निवडणूक प्रचार रॅलीत त्यांनी पाचशेच्या नोटा उधळल्या आहेत. श्रीरंगपटना येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या प्रजा ध्वनी यात्रेत हा प्रकार घडला. डीके शिवकुमार यांनी प्रवीण यांच्यावर नांजे गौडा आणि उरी गौडा यांच्या नावाने प्रवेशद्वार बनवण्यास परवानगी दिल्याचा आरोप केला होता. नांजे आणि उरी यांनी म्हैसूरचा शासक टिपू सुलतानची हत्या केली होती, असे हिंदू कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.

karnataka congress president d k shivakumar
Mumbai News : ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar यांच्यावर गुन्हा दाखल ; BEST कर्मचाऱ्यांच्या PF वर मारला डल्ला ?

कर्नाटक विधानसाठी एकूण 224 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची मोर्चेबांधणी अनेक महिन्यांपासून सुरु आहे.

येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने (भाजप) मुस्लिमांसाठी असलेले 4% आरक्षण काढून ते लिंगायत आणि वोक्कलिग या समहाला दिले आहे. त्यामुळेही कर्नाटकमध्ये हिंदू-मुस्लिम असा वाद होण्याची शक्यता आहे. या वेळच्या निवडणुकीत कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात वजन टाकते याबाबत उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com