BJP-Congress Politics: पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस हिरवा झेंडा दाखवला; पण प्रवास पुर्ण होण्याआधीच...

Keral Politics| भाजप युवा मोर्चाच्या तक्रारीवरून आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे.
BJP-Congress Politics:
BJP-Congress Politics: Sarkarnama
Published on
Updated on

BJP-Congress Politics पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी (25 एप्रिल) केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मात्र, ट्रेनने आपला पहिला प्रवास पूर्ण करण्याआधीच एका वादाला तोंड फुटले. पलक्कडमधील शोरानूर स्थानकावर रेल्वेच्या स्वागतादरम्यान एका काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाचे खासदार व्ही.के. श्रीकंदन यांचे अनेक पोस्टर्स बोगीवर चिकटवले. मात्र, नंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) जवानांनी पोस्टर हटवले आणि याप्रकरणी गुन्हा दाखल केला. (PM flags off Vande Bharat Express; But before the journey is over...)

ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या तक्रारीवरून आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे. तर, कोणत्याही कार्यकर्त्याला रेल्वेत पोस्टर लावण्यास सांगितले नसल्याचं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. (National Politics)

BJP-Congress Politics:
BJP-Congress Politics: पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस हिरवा झेंडा दाखवला; पण प्रवास पुर्ण होण्याआधीच...

तर आपल्या नकळत हे पोस्टर लावण्यात आल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीकंदन यांनी दिली.स्टेशनवर उपस्थित असलेल्या एकाही कामगाराकडे पोस्टर्स किंवा गोंद नव्हते. पण फोटो काढण्याच्या उद्देशाने कोणीतरी पावसात भिजलेल्या काचेच्या खिडकीवर पोस्टर चिकटवले असावेत अशी शंका खासदार श्रीकंदन यांनी व्यक्त केली आहे. तसेच, वाद निर्माण करण्यासाठी भाजपने हे जाणूनबुजून केले असावे, असा आरोप श्रीकंदन यांनी केला. (BJP-Congress Politics)

रेल्वेचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस समर्थकांचा एक गट स्टेशनवर जमले होते.त्यावेळी पाऊसही पडत होता.ही संधी साधत काही कामगारांनी बोगीच्या ओल्या काचेच्या खिडक्यांवर पोस्टर चिकटवले असावेत, असंही सांगितलं जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com