PM Modi At France : पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये फ्रान्स दौऱ्यावर; AI शिखर परिषदेत होणार सहभागी

PM Modi to attend AI Action Summit in France : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
PM Modi to attend AI Action Summit in France
PM Modi to attend AI Action Summit in FranceSarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 फेब्रुवारीला फ्रान्समध्ये दौऱ्यावर असणार आहेत. पॅरिसमध्ये होणाऱ्या या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) त्यांच्या फ्रान्स दौऱ्यात एआय शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत. तसेच या शिखर परिषदेमुळे भारतासोबतच आयईए, अमेरिका, चीन आणि आखाती देशांसारख्या विविध जागतिक देशांशी संवाद साधला जाणार आहे.

PM Modi to attend AI Action Summit in France
Narendra Modi-Giorgia Meloni : मेलोनी यांच्यासोबतच्या मीम्सवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी; म्हणाले...

अमेरिका, चीन आणि भारत यासारख्या प्रमुख उदयोन्मुख देशांसोबतच आखाती देशांचीही या समिटमध्ये सहभाग असणार आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॅक्शन समिटसाठी 90 देशांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. चुकीची माहिती आणि एआयचा गैरवापर हे असे विषय आहेत ज्यांवर चर्चा केली जाईल.

PM Modi to attend AI Action Summit in France
Narendra Modi : पहिल्या पॉडकास्टमध्ये भरभरून बोलले नरेंद्र मोदी..!

हा कार्यक्रम पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

या समिटमध्ये पाच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये 'एआय'द्वारे सार्वजनिक हित, कामाचे भविष्य, नवीन उपक्रम आणि संस्कृती, एआयवरील विश्वास आणि जागतिक एआय प्रशासन या विषयांचा समावेश असणार आहे. १० फेब्रुवारी रोजी, राज्यप्रमुख आणि सरकारच्या प्रतिनिधींचा सहभागी असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com