PM Modi Ayodhya : राम मंदिर सोहळ्याला नक्की या; मोदींनी स्वतः दिलं निषाद कुटुंबाला निमंत्रण, काय आहे कारण?

PM Modi Meets Nishad Family In Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा चर्चेत...
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Ayodhya Visit : अयोध्येतील राम मंदिर प्राणपतिष्ठापना सोहळाजवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा अयोध्येचा दौरा महत्त्वाचा ठरला. अयोध्येतील नवीन विमानतळावर पंतप्रधान मोदींचे विमान उतरले. विमानतळावरून ते अयोध्या धाम रेल्वे जंक्शनला गेले. यावेळी पंतप्रधान मोदींनी रोड शो केला. अयोध्येतील जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी अयोध्या धाम रेल्वे जंक्शनचे लोकार्पण करत निरीक्षण केले.

PM Modi
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यातील भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे

अयोध्या धाम जंक्शनवरून पंतप्रधान मोदी लता मंगेशकर चौकात पोहोचले. रस्त्यात त्यांनी निषाद कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र रवींद्र मांझी आणि निषाध कुटुंबीयांना दिले. 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला येण्याचा आग्रह केला. यावेळी राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत रायही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी निषाध कुटुंबातील एका लहान मुलीसोबत सेल्फीही काढला.

कोण आहेत निषाद?

वनवासाला निघालेल्या प्रभु श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांना निषाद राज यांनी आपल्या नावेतून शरयू नदी पलिकडे सोडले होते. पंतप्रधान मोदींनी अयोध्येत आज ज्यांची भेट घेतली ते कुटुंब हे निषाद राज यांचे वंशज आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काही दिवसांपूर्वी निषाद कुटुंबाची भेट घेतली होती. त्यांच्या घरी भोजनही केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिर परिसरात निषाध राज यांच्या स्मरणात मंदिर उभारण्याचीही योजना आहे. या ठिकाणी त्यांची मूर्ती स्थापन केली जाईल. निषाध कुटुंबाला भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी मिरा यांच्या घरी पोहोचले. त्या एक कामगार आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याकडे चहा घेतला. पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत गप्पा केल्या आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. तसेच कॉलेजची विद्यार्थिनी स्वाती आणि आठवीत शिकणाऱ्या अनुजने काढलेल्या राम मंदिराच्या चित्रावर पंतप्रधान मोदींनी आपली स्वाक्षरीही दिली.

edited by sachin fulpagare

PM Modi
PM Modi Ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत येऊ नका; मोदी असे का म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com