PM Modi Birthday : ७२ वर्षीय मोदींचे ८ वर्षांत ६७ परदेश दौरे ; ३०३६ दिवस सत्तेत असलेले पहिले काँग्रेसेतर पीएम

PM Modi Birthday : वयाच्या ५१ व्या वर्षी, मोदी आमदार होण्यापूर्वीच गुजरातचे १४ वे मुख्यमंत्री बनले.
PM Narendra Modi | Dehu Visit |
PM Narendra Modi | Dehu Visit |ANI
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज (शनिवार) 72 वा वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांच्या जन्म १७ सप्टेंबर १९५० मध्ये एका सर्वसामान्य घरात झाला. पण जिद्द आणि चिकाटीमुळे आज ते भारताचे पंतप्रधान आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी, मोदी आमदार होण्यापूर्वीच गुजरातचे 14 वे मुख्यमंत्री बनले. (PM Modi Birthday 2022 news update)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन नेहमी मोठी चर्चा केली जाते. पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशात जास्त असतात अशी विरोधकांकडून टीका केली जाते. नरेंद्र मोदींच्या राजकीय जीवनाविषयी जाणून घेऊया !

Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
  • नरेंद्र मोदी हे २००१ मध्ये आमदार होण्यापूर्वी गुजरातचे १४ वे मुख्यमंत्री झाले आहेत. ते चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते.

  • ६३ वर्षांचे असताना मोदी हे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले.

  • मोदी ६४ वर्षांचे असताना २६ मे २०१४ रोजी देशाचे पंतप्रधान झाले. १८ वे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली.

  • पंतप्रधान म्हणून ते पहिल्यांदाच १५ जून २०१४ रोजी परदेश दौऱ्यासाठी भूतानला गेले.

  • मोदी ६९ वर्षांचे असताना दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत ६७ परदेश दौरे केले आहेत.

  • सात वेळा ते अमेरिकेला गेले आहेत. आत्तापर्यंत पाच वेळा त्यांनी चीन, रशिया, नेपाळ, जपानला भेट दिली आहे.

PM Narendra Modi | Dehu Visit |
PM Modi Birthday : ४० मिनिटांत '56 इंच मोदी जी' थाळी संपवा, मिळवा 8.5 लाखांचे बक्षीस
  • २०१५ ते २०२० पर्यंत त्यांनी केलेल्या ५८ देशांच्या परदेश दौऱ्यासाठी ५१७ कोटी रुपये खर्च झाला आहे.

  • ३०३६ दिवस पंतप्रधानपदी विराजमान असलेले मोदी हे देशातील पहिले कॉंग्रेसत्तर पंतप्रधान आहेत.

  • प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद, दौपदी मुर्मू यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. एकाही निवडणुकीत मोदींचा पराभव झालेला नाही.

  • आत्तापर्यंत मोदींनी ९२ वेळा 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला आहे.

  • टि्वटवर त्यांचे ८.२४ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर ४.७० दशलक्ष फेसबूक फॅालोअर्स आहेत.६.९१ कोटी इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com