
Budget 2025 Announcement on Income Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2025-26 साठी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वसामान्यांचा, सर्वसामान्यांसाठींचा अर्थसंकल्प असे केले. अर्थमंत्री म्हणाल्या मध्यम वर्गासाठी कर कपातीची भेट देण्याच्या विचारास पंतप्रधान मोदी यांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला होता, परंतु अधिकाऱ्यांना समजावण्यात वेळ लागला.
अर्थमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटले की, आम्ही मध्यमवर्गीयांचा आवाज ऐकला. मध्यमवर्गीयांकडून प्रदीर्घ काळापासून तक्रार केली जात होती, की प्रामाणिकपणे कर भरूनही त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही पावलं उचलली जात नाहीत. कमाईवर कर देणाऱ्या करदातांची इच्छा होती की, सरकारने अशी पावलं उचलावी ज्यामुळे ते महागाई आणि जीवनातील अन्य आव्हानांना सहजपणे सामोरे जावू शकतील.
पंतप्रधान मोदींनी(PM Modi) या मध्यवर्गाला दिलास देण्यास मार्ग शोधण्याचे काम निर्मला सीतारामन यांना दिलं होतं. पंतप्रधान मोदी तर मोठ्याप्रमाणात कर कपातीसाठी तत्काळ तयार झाले, परंतु अर्थ मंत्रालय आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(CBDT)च्या अधिकाऱ्यांना यासाठी तयार करण्यास थोडा वेळ गेला. या अधिकाऱ्यांना याची चिंता होती की एवढी मोठी कर कपात केल्याने महसूल उभारणीत मोठी अडचण येईल.
केंद्र सरकारच्या सामाजिक कल्याणासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांसह अन्य खर्चांसाठी संसाधनांची आवश्यकता आहे. या योजनांसाठीची तरतूद देखील साधारणपणे प्रत्येक अर्थसंकल्पात वाढवली जाते. सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर करताना वैयक्तिक आय़कर मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. यामुळे आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर शून्य कर असणार आहे.
याआधी सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. याशिवाय कररचेनत बदल देखील करण्यात आला आहे. यामुळे 12 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई करणाऱ्यांना 1.1 लाख रुपये वाचवण्यात मदत मिळेल. कर मुक्तीच्या मर्यादेत एकाचेवेळी पाच लाख रुपयांपर्यंतची वाढ ही आतापर्यंत सर्वात मोठा दिलासा देणारी बाब ठरली आहे. ही 2005 आणि 2023 दरम्यान दिल्या गेलेल्या सर्वच कर सवलतींइतकी आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, माझे मत आहे की, पंतप्रधानांनी या कर सवलतीस अतिशय सुंदर शब्दात अतिशय चांगल्याप्रकारे सादर केले. त्यांनी हे म्हटले की हा लोकांचा अर्थसंकल्प आहे, हा तसाच अर्थसंकल्प आहे जसा लोकांना हवा होता. तर अर्थसंकल्पाची व्याख्या त्यांच्या स्वत:च्या शब्दात करण्यास सांगितल्यावर अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, जसं अब्राहम लिंकन यांच्या शब्दात लोकशाहीत म्हणतात तसं, हा अर्थसंकल्प लोकांद्वारे, लोकांचा आणि लोकांसाठीचा आहे.
सीतारामन यांनी म्हटले की, नवी कर रचना मध्यमवर्गीयांवरील करांचे ओझे कमी करेल आणि त्यांच्याकडे जास्त पैसे राहतील. यामुळे देशांतर्गत वापर, बचत आणि गुंतवणूक वाढेल. तसेच, मोठ्या कर कपाती मागील विचार स्पष्ट करत सीतारामनयांनी म्हटेल की यावर काही काळापासून काम सुरू होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.