PM Modi News: मोदींच्या सभेसाठी २६ एकरवर मंडप, दोन हजार एसटी बस, तीन लाख महिला येणार

PM Modi Visit Yavatmal Updates: ४२ एकर खुल्या जागेवर हा महिला मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला आहे.
PM Modi Updates
PM Modi UpdatesSarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi News) यांची उद्या (28 फेब्रुवारी) यवतमाळ येथे सभा होत आहे. भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. बचत गटांच्या महिलांना मोदी (PM Modi Visit Yavatmal Updates) संबोधित करणार असल्याने यासाठी पुरेपूर तयारी केली जात आहे.

तीन लाख महिला या मेळाव्यासाठी आणण्याचे भाजपने नियोजन केले आहे. दोन हजार एसटी बसमधून महिलांना सभास्थळी आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मोदींच्या सभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कंबर कसली आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहे. राठोड यांनी याबाबत नुकताच महसूल भवनात आढावा घेतला आहे. सभेच्या तयारीची माहिती दिली. ४२ एकर खुल्या जागेवर हा महिला मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला आहे.

PM Modi Updates
Ajit Pawar News: भाजप, शिवसेनेसोबत का गेलो? अजितदादांनी सांगितलं कारण...कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं...

सभेच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या ३० समित्या तयार करण्यात आल्या आहे. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास, बैठक, पाणी व्यवस्था उत्तमपणे होणे आवश्यक आहे. परिसरात स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात उभारण्यात यावे, येथे येणाऱ्या महिलांच्या गर्दी व्यवस्थापनासह स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचा आढावा, मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला. सभा परिसरात सात हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.स्टेज आणि मंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहेत.

सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना ने आण करण्यासाठी हजारो वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचं धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातून एसटी महामंडळाच्या १५० बसेस यवतमाळ विभागीय कार्यल्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने बस जिल्ह्यातून बाहेर एका सभेसाठी पाठविण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रवाशी सेवा कोलमोडली आहे. बुलढाणा बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे.. प्रवासी सेवा खोळंबली असून प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

भावना गवळींचे बॅनर झळकले

गेल्या काही महिन्यांपासून उमेदवारी मिळणार की,नाही या वरून चर्चेत असलेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त चर्चेत आल्या आहेत. सभेच्या निमित्ताने खासदार गवळींचे बॅनर परिसरात झळकले आहेत. त्यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहेत.

बॅनर्सवर 'देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा यवतमाळ नगरीत स्वागत; अशा स्वरूपाचा मजकूर लिहिला आहे. यात शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खासदार गवळी एकाएकी पडल्या का? गवळी शिंदे गटावर नाराज तर नाही ना अशी चर्चा सुरू आहेत.

PM Modi Updates
Ajit Pawar News: भाजप, शिवसेनेसोबत का गेलो? अजितदादांनी सांगितलं कारण...कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com