Modi at Manipur
Modi at Manipur

PM Modi in Manipur: तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी....; PM मोदींचा मणिपुरी जनतेला मोलाचा सल्ला

PM Modi in Manipur: मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून सातत्यानं हिंसाचार उफाळून येत असताना पंतप्रधान मोदींनी राज्याला पहिल्यांदाच भेट दिली आहे.
Published on

PM Modi in Manipur: मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये सातत्यानं सुरु असलेल्या रक्तरंजित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या जनतेला शांततेचं आवाहन केलं त्यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी एक मोलाचा सल्लाही दिला.

हिंसाचारादरम्यान सर्वात जास्त फटका बसलेल्या चूरचंदपूर इथं विकास कामांचं उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, मणिपूर ही आशा आणि आकांक्षेची भूमी आहे. मी पीडितांच्या कॅम्पला भेट दिली, तसंच त्यांची भेट घेतल्यानंतर मी हे अत्यंत विश्वासानं सागू शकतो की मणिपूरमध्ये आशेची नवी पहाट आणि विश्वास वाढीस लागला आहे. मणिपूरच्या नावातच मनी हा शब्द आहे. याचा अर्थ असा की हे राज्य भविष्यात संपूर्ण ईशान्य भारताला उजळून काढणार आहे. मोदी यांनी या ठिकाणी ७००० कोटींच्या विकास कामांची पायाभरणी केली. तसंच आपल्या सरकारनं भारताच्या सीमावर्ती राज्यांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

मोदी म्हणाले, विकासासाठी शांतता आवश्यक आहे आणि अलिकडच्या काही महिन्यांत डोंगर आणि दऱ्यांमधील गटांशी झालेल्या यशस्वी वाटाघाटींकडे लक्ष वेधलं. मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गावर पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचं आवाहन करतो. मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्यासोबत आहे. भारत सरकार तुमच्यासोबत, मणिपूरच्या लोकांसोबत आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी मणिपूरसाठी ३,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केलं. ज्यामध्ये हिंसाचारामुळं विस्थापित झालेल्यांना मदत करण्यासाठी ५०० कोटी रुपये समाविष्ट आहेत. तसंच घरं गमावलेल्या कुटुंबांसाठी ७,००० नवीन घरं बांधण्यास सरकार मदत करत आहे आणि योग्य ठिकाणी पुनर्वसनाला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदींनी मणिपूरी जनतेला दिलं.

भारत सरकार मणिपूरमध्ये जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही यावेळी मोदी म्हणाले. राज्यात पुन्हा सामान्य परिस्थिती प्रस्थापित करण्यासाठी तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारला पाठिंबा देण्याचं आवाहनही यावेळी मोदींनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com