PM Narendra Modi police reforms : पंतप्रधान मोदींच्या पोलिसांकडून अपेक्षा वाढल्या; बंदी अन् डाव्यांच्या अतिरेकी भागांवर देखरेखीसाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज

PM Modi Calls for Change in Public Perception of Police at 60th DGP-IGP Meet : रायपूर इथं झालेल्या 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक व महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत मार्गदर्शन केलं.
PM Narendra Modi police reforms
PM Narendra Modi police reformsSarkarnama
Published on
Updated on

Police modernization India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतातील पोलिसांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तसं त्यांनी त्या अपेक्षा अखिल भारतीय पोलिस महासंचालक व महानिरीक्षक परिषदेत बोलून दाखवली. देशात बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली.

डाव्या विचारसरणीच्या अतिरेकापासून मुक्त झालेल्या भागांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी नवीन मॉडेल अंगीकारणे आवश्यक आहे. तसंच उपलब्ध ‘डेटाबेस’चा प्रभावी वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने ‘कार्यक्षम गुप्त माहिती’ या क्षेत्रात काम करण्याचे महत्त्व देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

60 व्या अखिल भारतीय पोलिस (Police) महासंचालक व महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. पोलिस दलाबाबत जनमानसात असलेली धारणा तातडीने बदलण्याची गरज आहे, हे सांगताना, तरुणांमध्ये पोलिसांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि प्रतिसादक्षमता वाढविण्याचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.

या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतातील पोलिसांकडून खूप काही अपेक्षा आहेत, असे सांगताना, ‘‘देशातील बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली. तसंच डाव्या विचारसरणीच्या अतिरेकापासून मुक्त झालेल्या भागांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी नवीन मॉडेल अंगीकारणे आवश्यकता पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

PM Narendra Modi police reforms
Prithviraj Chavan Epstein Files : पृथ्वीराज चव्हाणांच्या सूचक पोस्टनं खळबळ! अमेरिकन संसदची 'एपस्टाईन फाईल्स', भारतीय राजकारणावर परिणाम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस दलांनी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली. उपलब्ध ‘डेटाबेस’चा प्रभावी वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने ‘कार्यक्षम गुप्त माहिती’ या क्षेत्रात काम करण्याचे महत्वाचे आहे, याकडे लक्ष वेधले. तसं ‘विकसित भारताची सुरक्षा परिमाणे,’ असे या परिषदेचे सूत्र आहे, याचं गांभीर्य मोठं असल्याचं मोदींनी सांगितलं.

PM Narendra Modi police reforms
Muslim Vote Promise BJP : मी अंबानी यांना पैसे मागेन, त्यांच्याशी माझे चांगले संबंध; मंत्री महाजनांनी मतांसाठी मुस्लिमांना चुचकारलं!

पोलिस तपासात फॉरेन्सिकचा वापर...

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘पोलिसांविषयीची जनमानसातील धारणा तातडीने बदलायला हवी. पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असा विश्वास नागरिकांना मिळायला हवा. शहरी भागात गस्त अधिक क्षमतेने घातली गेली पाहिजे; तसंच पर्यटनाच्या भागातही कठोर सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांनी पोलिस तपासाच्या फॉरेन्सिकच्या वापराबाबत अधिक अभ्यास करावा आणि न्यायव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

पोलिस प्रमुखांमध्ये सज्जता व समन्वय

पंतप्रधानांनी अमली पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रणासाठी ‘संपूर्ण सरकार दृष्टिकोन’ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यात अंमलबजावणी, पुनर्वसन आणि समाजस्तरीय हस्तक्षेप यांचा समावेश असावा, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींविरोधात प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलिस प्रमुखांना सज्जता व समन्वय वाढविण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com