पंतप्रधान मोदींच्या 'गुड फ्रेंड' अडचणीत; 'या' प्रकरणी न्यायालयीन चौकशीची टांगती तलवार

Prime Minister Giorgia Meloni : यांच्याविरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेलोनीवर आयसीसीच्या अटक वॉरंटनंतर अटक केलेल्या लिबियन पोलिस अधिकाऱ्याला सोडल्याचा आरोप आहे.
PM Modi and  Giorgia Meloni
PM Modi and Giorgia MeloniSarkarnama
Published on
Updated on

Prime Minister Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी अडचणीत सापडल्या आहेत. मेलोनी यांच्याविरुद्ध तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. ICC वॉन्टेड लिबियन अधिकाऱ्याच्या सुटकेचे प्रकरण जॉर्जिया यांना चांगलेच भोवले आहे. यांच्याविरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेलोनीवर आयसीसीच्या अटक वॉरंटनंतर अटक केलेल्या लिबियन पोलिस अधिकाऱ्याला सोडल्याचा आरोप आहे. या चौकशीमुळे त्या राजीनामा देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मेलोनीविरुद्ध चौकशी का केली जात आहे?

ICC वॉन्टेड लिबियन अधिकारी ओसामा एल्मस्री नजीम यांना गेल्या आठवड्यात सोडण्यात आले. तसेच त्यांना इटालियन सरकारी विमानाने घरी पाठवण्यात आले. ट्यूरिन शहरात त्याच्या अटकेनंतर काही दिवसांनी ही घटना घडली. आयसीसीने या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे, असे म्हटले आहे की ICC ला याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती.

PM Modi and  Giorgia Meloni
Anjali Damania Video : 'अंजली दमानियांच्या मागे देवेंद्र फडणवीस...', स्वत:च सांगितली पडद्यामागची गोष्ट

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर

मेलोनी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्याविरुद्ध गुन्ह्यात मदत करणे आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी सुरु आहे म्हणून राजीनामा द्यावा असे कोणतेही बंधन माझ्यावर नाही. चौकशी सुरू होणे म्हणजे दोषी ठरवले जात नाही.

PM Modi and  Giorgia Meloni
UCC Notification : UCC अंतर्गत विवाहाची नोंदणी करणारे पहिले दापत्य तुम्हाला माहीत आहे का?

या प्रकरणात आयसीसीने काय म्हटले?

आयसीसीने म्हटले आहे की ओसामा एल्मस्री नजीमवर खून, छळ, बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराचा आरोप आहे. १८ जानेवारीला इटलीसह इतर सदस्य राष्ट्रांना वॉरंट पाठवण्यात आले. न्यायालयाने नजीम युरोपमध्ये दाखल झाल्याची वास्तविक माहिती देखील दिली.

न्यायालयाने म्हटले आहे की त्यांनी त्यावेळी इटलीला आठवण करून दिली होती की जर त्यांना त्या वॉरंटला सहकार्य करण्यात काही अडचण येत असेल तर त्यांनी विलंब न करता न्यायालयाशी संपर्क साधावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com