Anjali Damania News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस हे आपल्या विरोधकांना संपवत असल्याचा आरोप होत होता. एकनाथ खडसे यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर सिंचन घोटाळ्याचे कागदपत्रे फडणवीसांनीच दमानिया यांनी दिले होते, अशी चर्चा होती. मात्र, आपल्या मागे खरच फडणवीस आहेत का? याचे उत्तर दमानिया यांनी 'साम टिव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, 'मी सिंचन घोटाळ्याचा अभ्यास केला होता. त्यातील बारीक सारीक तपशील तपासले होते. या संदर्भात कागदपत्रे घेऊन मी अनेक संपादकांना भेटले होते. एकनाथ खडसेंना भेटले तेव्हा मला सांगण्यात आले की एक अभ्यासू आमदार आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना भेटा'.
'मी देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांना सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातील कागदपत्रे दिली. त्यांनी ते प्रकरण लावून धरले. लोक म्हणतात की फडणवीसांनी मला सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे दिली मात्र हे उलटे होते. मीच त्यांना कागदपत्रे दिली', असे देखील दमानिया यांनी सांगितले.
'देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याचे प्रकरण लावून धरल्याने मी म्हटले होते की मला देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी आदर आहे. मात्र, ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप होते त्या अजित पवारांच्या सोबत फडणवीसांनी शपथ घेतली तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली.', असे दमानिया यांनी म्हटले.
'फडणवीसांना मी चांगला माणुस समजत होते. तसच मी केजरीवाल यांना देखील चांगले समजत होते. जर ही माणसं चांगली तर मग वाईट काय होती? ', असा टोलाही दमानिया यांनी लगावला.
अंजली दमानिया या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला जातो? यावर बोलताना त्या म्हणाल्या, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढते. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधात बोलले. मी एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांच्या विरोधातही लढले आहे. खडसेंच्या लोकांनी मला त्रास दिला. विविध ठिकाणी माझ्या विरोधात मानहानीचे दावे दाखल केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.