PM Narendra Modi At Red Fort : देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींची 'त्रिवेणी'; तरुणांना दिला मोठा संदेश

Independence Day PM Speech : जगाचा भारतावर विश्वास वाढला असून आता थांबणार नाही
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'त्रिवेणी' सांगत तरुणांना संदेश दिला. ही 'त्रिवेणी' म्हणजे भारताची लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता आहे. हे तीनही घटक भारताचे बलस्थान असून याद्वारे देशाची सर्व स्वप्ने साकार करण्याची क्षमता असल्याचे मोदी देशातील तरुणांना उद्देशून बोलले. (Latest Political News)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझा युवा शक्तीवर विश्वास आहे. लहान शहरांतील तरुणही विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसत आहे. देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या तीन 'स्टार्टअप इकोसिस्टम'मध्ये स्थान मिळवून दिले आहे. आजच्या तंत्रज्ञानावर आधारित जगात भारतातील तरुण प्रतिभांचा मोठा वाटा आहे. बदलत्या जगाला आकार देताना, भारतीय लोकांची क्षमता दिसून येते."

Narendra Modi
Narendra Modi Speech : 1 हजार वर्षांची गुलामी अन् पुढील हजार वर्षांची भव्यता, दोन्हीमध्ये भारत उभा ; नरेंद्र मोदी

"भारताची सर्वात मोठी क्षमता ही विश्वास आहे. लोकांचा सरकारवर आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यावर जगाचा विश्वास वाढत आहे. आता देशात 'जर-तर'ची भाषा होत नाही. त्यामुळे देशात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. भारताचा नवा उदय आणि विकासामुळे देशात सर्व पातळीवर नूतनीकरण होत असून जगाचे आपल्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे निर्माण झालेली ही संधी आपण दवडू शकत नाही. जग हे तंत्रज्ञानावर आधारित असून तंत्रज्ञानातील कौशल्यामुळे भारताची जागतिक स्तरावर नवीन भूमिका आणि प्रभाव पडेल", असा विश्वास व्यक्त करत मोदींनी आता थांबणार नसल्याचे निर्धार केला.

Narendra Modi
PM Narendra Modi : मणिपूरमध्ये शांतता पसरत आहे; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा दावा

येणाऱ्या काळात देश जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला. तसेच दोन कोटी महिलांना लखपती बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही मोदींनी लाल किल्ल्यावरून केली आहे. देशाने गेल्या नऊ वर्षात ज्या वेगाने प्रगती केली, ही वाटचाल भविष्यातही कायम राहणार असून देशातून भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन कीडी उखडून टाका, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com