New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवला. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वीच भारतीयांना मोठी गुडन्यूज दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी(ता.15) स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जीएसटी कररचनेत मोठे सुधार करण्याची घोषणा केली होती. गेल्या 8 वर्षांत आपण जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत. पूर्ण देशभरातील करांमध्ये कपात केली. करांमध्ये सुधारणा केली.आता देशातील कर कमी करण्याची वेळ आल्याचा उल्लेख करत थोडक्यात जीएसटीच्या पुनर्रचनेचे संकेतच दिले होते.
मोदी यांनी आपल्या भाषणात जीएसटीची (GST) पुनर्रचना ही आता काळाची मागणी असल्याचंही म्हटलं होतं. तसेच पुढील पिढीसाठी जीएसटीची पुनर्रचना केली जावी असंही भाषणात नमूद केलं होतं. हे नवीन जीएसटी रिफॉर्म्स यंदाच्या दिवाळीपूर्वी ही तुमच्यासाठी एक भेट असणार असल्याचंही पंतप्रधानांनी भाषणात सांगितलं होतं.
आता 8 वर्षांनी काळाची गरज आहे की, आम्ही हे रिव्ह्यूव्ह करावे.यानंतर आम्ही एका उच्चस्तरीय समिती स्थापित केली.त्यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चा केली.राज्य सरकारांसोबतही चर्चा केली आणि आता आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणत आहोत,असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकिल्ल्यावरुन म्हटलं होतं.
याबाबत आता पीटीआयने मोठी अपडेट दिली आहे. त्यात सरकारी सूत्रांच्या हवाल्याने जीएसटी कररचनेत मोठे बदल होणार असल्याचे वृत्त समोर आणले आहे. यात केंद्र सरकारने सुधारित वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणालीअंतर्गत 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन दर प्रस्तावित केले असल्याचं पीटीआयनं शुक्रवारी सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
सध्याच्या 28 टक्के कर श्रेणीतील 90 टक्के करपात्र वस्तू सुधारित कर प्रणालीमध्ये 18 टक्क्यांच्या श्रेणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या बदलांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.पण दुसरीकडे तंबाखू यांसह इतरही काही वस्तूंवरचा जीएसटी वाढणार असल्याची माहिती आहे.
सुधारित जीएसटी प्रणालीमध्ये सामान्य माणसाच्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांवर 5 टक्के कर आकारला जाणार असल्याची शक्यता आहे. तर चैनींच्या वस्तूंसह तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या हानिकारक पदार्थांवर 40 टक्के कर लावला जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच जीएसटी दरांमध्ये कपात संकेत दिले होते. सरकारने जीएसटीबाबत निर्णय घेतल्यास अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहेत. त्यासाठी सरकारकडून काही पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती आहे. पहिला पर्याय म्हणजे 12 टक्के जीएसटी स्लॅबमधील बहुतेक वस्तूंना 5 टक्के स्लॅबमध्ये टाकणे आणि दुसरा पर्याय म्हणजे 12 टक्केचा स्लॅब पूर्णपणे समाप्त करणे. मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. यामुळे सरकारवर तब्बल 40 ते 50 हजार कोटींचा बोजा पडेल, असा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.