Delhi News : देशाला भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगुलचालन ही देशाला लागलेली कीड आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या राक्षसाने देशाला आवळले होते, त्या जोखडातून देशाची सुटका केली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्री मोदींनी लाल किल्ल्यावरून काँग्रेसवर तोफ डागली. देश प्रगतिपथावर असून विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपला साथ द्या, असेही आवाहन मोदींनी केले आहे. (Latest Political News)
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर दहाव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले. मोदींनी भाषणाच्या सुरुवातीस देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. भारत आपल्या अमृतकाळात असून देशात विकासाची गंगा वाहून लागल्याने अवघ्या जगाच्या नजरा आपल्याकडे असल्याचेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले. देशाच्या प्रगतीचा आढावा घेताना मोदींनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.
नरेंद्र मोदी म्हणाले, "यापूर्वी देशात भ्रष्टाचाराचे जाळे पसरले होते. प्रत्येक योजनेत, प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता होता. देशातील लोकांनी दिलेला कर रुपातील पैशाने ठराविक कुटुंबाचे खिसे भरत होते. देशाला भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या राक्षसाने जखडून ठेवल्यानेच विकास खुंटला होता. देशात लांगुलचालनाची वाईट प्रथा पडली होती. या सर्वांपासून देशाची गेल्या वर्षात सुटका करण्यात आली आहे. लोकांच्या प्रत्येक पैसा विकासाच्या कामात गुंतवला जात आहे."
भ्रष्टाचारास काँग्रेस जाबाबदार असल्याची टीका करताना मोदी म्हणाले, "२०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती. आज आपण जगात पाचव्या क्रमांकावर आहोत. हा टप्पा गाठण्यासाठी प्रथम देशातील भ्रष्टाचाराच्या मूळावर घाव घालावा लागला. दररोज राजरोसपणे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत असल्यानेच आपली अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती."
दहा वर्षांचा हिशोब देताना मोदी म्हणाले, "राज्यांना दहा वर्षांपूर्वी ३० लाख कोटी रुपये जात होते. आता हा आकडा १०० लाख कोटींहून अधिक आहे. तर गरीबांच्या घरांसाठी ९० हजार कोटी खर्च होत होते तोच आकडा आता चार लाख कोटींपेक्षा अधिकचा आहे. शेतकऱ्यांना स्वस्त युरिया मिळण्यासाठी १० लाख कोटींचे अनुदान दिले जात आहे. मुद्रा योजना स्वयंरोजगारासाठी २० लाख कोटी रुपये दिले असून आठ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरु केले आहेत."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.