Mamata Banerjee News : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. पण मोदींचं पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरुन केलेले हे भाषण हे शेवटचं भाषण असणार आहे. पुढील वर्षी पुन्हा मीच लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले असले तरी पुढील वर्षी त्यांच्या हस्ते तिरंगा फडकणार नसल्याचे स्पष्ट करीत त्यांच्या भाषणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली.
कोलकाताच्या बेहाला येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भाषणावर टीकेची झोड उठवली आहे. "यंदाचं त्यांचं लाल किल्ल्यावरुन झालेलं त्यांचे स्वातंत्र्यदिनाचं देशाला उद्देशून झालेले भाषण हे शेवटचं भाषण असेल असेही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच पुढील वर्षी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील",असेही स्वांतत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्ष या निम्मिताने आरोप प्रत्यारोपाची एकही संधी सोडत नाही. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित एनडीए अॅक्टिव्ह झाली आहे.
दुसरीकडं भाजपविरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झाली असून या आघाडीच्या कामकाजानं वेग घेतला आहे.या दोन्ही युती आणि आघाडीकडून एकमेकांविरोधात डावपेच खेळायला सुरुवात झाली आहे. कसंही करुन भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखायचं हा चंगच 'इंडिया' आघाडीनं बांधला आहे त्यामुळेच सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.