PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदींचा लठ्ठपणाविरोधात पुढाकार; एका मुख्यमंत्र्यांसह 10 जणांना दिलं चॅलेंज

Mann Ki Baat Omar Abdullah Anand Mahindra Shreya Ghoshal Sudha Murty News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये लठ्ठपणाचा उल्लेख केला होता.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशात सातत्याने विविध विषयांवर नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातो. आता त्यांनी लठ्ठपणाविरोधात पुढाकार घेतला आहे. त्यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातही याचा उल्लेख केला होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी देशातील दहा व्यक्तींची या मोहिमेसाठी निवड केली आहे.

पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाविरोधात जनजागृती करण्यासाठी देशातील विविध क्षेत्रातील दहा व्यक्तींची निवड करताना एका मुख्यमंत्र्यांचाही त्यात समावेश केला आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे या यादीत आहेत. ते या यादीतील एकमेव राजकारणी आहेत. त्यातप्रमाणे राज्यसभेच्या खासदार आणि लेखिका सुधा मुर्तींचाही समावेश करण्यात आला आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi News : गुलामीची मानसिकता..! अखेर मोदींनी संधी साधली, विरोधकांवर चढवला हल्ला

पंतप्रधान मोदींनी सोमवारी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी या लोकांना नॉमिनेट करत आहे. त्यांनी लठ्ठपणाविरोधात आपली लढाई अधिक मजबूत करावी आणि खाद्यतेलाची वापर कमी करण्याबाबत जागरुकता निर्माण करावी. तसेच ही चळवळ मोठी करण्यासाठी त्यांनीही प्रत्येकी दहा व्यक्तींची निवड करावी, असे आवाहन मोदींनी केले आहे.

कोण आहेत पंतप्रधानांच्या यादीत?

ओमर अब्दुल्ला आणि सुधा मुर्ती यांच्यासह उद्योगपती आनंद महिंद्रा, दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल, भोजपुरी गायक आणि अभिनेता निरहुआ, शुटिंग चॅम्पियन मनु भाकर, वेटलिफ्टर मीराबाई चानू, इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी, अभिनेता आर. माधवन, गायिका श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा मोदींना इशारा; कोर्टात फौजदारी केस करणार... काय घडलं?

'मन की बात'मध्ये काय म्हणाले?

मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाची समस्या कमी करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले होते. लठ्ठपणाविरोधात लढा उभारण्यावर त्यांनी जोर दिला होता. खाण्यामध्ये तेलाचा कमी वापर, तेलाचे सेवन 10 टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच प्रत्येकाने हे चॅलेंज हा लोकांना देण्याचे आवाहनही केले होते. त्याची सुरूवात त्यांनी स्वत:पासून केली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com