PM Modi : बिहारनंतर भाजपचं पुढचं मिशन ठरलं पश्चिम बंगाल, मोदींनी आपल्या खासदारांना दिला 'हा' खास संदेश

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगालच्या खासदारांना आवाहन पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा, जनतेशी संवाद वाढवा असा स्पष्ट संदेश पंतप्रधान मोदी यांनी भाजप खासदारांना दिला आहे.
PM Narendra Modi advising BJP MPs from West Bengal to intensify groundwork and prepare strategic outreach for the 2025 Assembly election.
PM Narendra Modi advising BJP MPs from West Bengal to intensify groundwork and prepare strategic outreach for the 2025 Assembly election.Sarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi : नवी दिल्ली, (ता. 3) : पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या राज्यातील भाजप खासदारांना दिला. संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी मोदी यांची भेट घेतली. राज्यातील विद्यमान स्थितीच्या अनुषंगाने जनतेशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी खासदारांना सांगितले.

स्थानिक पातळीवर जे काही घडत आहे, त्याचा कठोर विरोध करण्याची गरज आहे, असे सांगतानाच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सादरीकरण देण्याचे निर्देश मोदी यांनी खासदारांना दिले. हिंसाचारग्रस्त प. बंगालमध्ये मागील काही काळापासून भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमनेसामने आहेत.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत मोठा जोर लावूनही भाजपला विजय मिळवता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर राजकीय योजना आखत लोकांना संघटित करण्यासाठी व्यापक प्रमाणात काम करावे, असे मोदी यांनी खासदारांना सांगितले.

PM Narendra Modi advising BJP MPs from West Bengal to intensify groundwork and prepare strategic outreach for the 2025 Assembly election.
AIMIM West Bengal election preparation : 'AIMIM'चा काॅन्फिडंट वाढला; 'बिहार तो झांकी है, बंगाल और यूपी बाकी है', ठोकली आरोळी!

आसाममध्ये 100 जागांचे लक्ष्य...

आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 126 पैकी किमान 100 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असून त्या दृष्टीने योजना आखण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात सध्या भाजप आघाडीकडे 84 जागा आहेत. शंभर जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवत संघटनेला मजबुती देणे, युवक आणि महिलांना जास्तीत जास्त उमेदवारी देणे आणि लोकसांख्यिकीय आव्हानांचा मुकाबला करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

PM Narendra Modi advising BJP MPs from West Bengal to intensify groundwork and prepare strategic outreach for the 2025 Assembly election.
West Bengal Election: जुने खेळाडू, नवी रणनीती! तुम्हाला माजी मुख्यमंत्री करू; ममतादीदींना सुवेंदू अधिकारींचे आव्हान

मतदार संघ पुनर्रचनेनंतर 126 पैकी 103 मतदारसंघात हिंदू-आसामी बहुल जागांवर भाजप आणि तिचे सहयोगी पक्ष मजबूत स्थितीत आहेत. सहयोगी पक्षांमध्ये आसाम गण परिषद, यूपीपीएल, बीपीएफ यांचा समावेश आहे. अर्थात मुस्लिम लोकसंख्या वाढल्यामुळे भाजप युतीसाठी निवडणूक सोपी नाही, हे वास्तव आहे. ज्या सहा जागांवर भाजप कमजोर स्थितीत आहे, त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सत्ताविरोधी लाटेपासून वाचण्यासाठी अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com