Vishal Dhume News : निलंबित एसीपी ढुमेंचे अजब किस्से; दारू, चिकन-बिर्याणीवाले तर होतेच; दूधवालादेखील सोडला नाही

Vishal Dhume News : कामाची तपासणी करण्यापूर्वी 'अगोदर तुला किती पैसे मिळतात,' हा परवलीचा प्रश्न ते विचारायचे,
Vishal Dhume
Vishal Dhumesarkarnama
Published on
Updated on

Vishal Dhume News : औरंगाबाद पोलिस दलात थेट सहायक पोलिस आयुक्त (ACP) विशाल ढुमे (Vishal Dhume) याच्यावर महिलेची छेड काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. शहरातील सिटी चौक पोलिसांत हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे.

निंलबनानंतरही विशाल ढुमेच्या 'कर्तृत्वाचे'अनेक किस्से आता ऐकायला मिळत आहेत. त्यांच्या कारनामे जनतेसमोर येत आहेत. कोणी कितीही मोठा असो, एक दिवस त्याला चांगली अद्दल घडत असते, हा नियतीचा खेळ आहे, अशा चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. या कारवाईनंतर कर्मचारी आणि अधिकारी खुश झाले असल्याचे दिसते.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने काल शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या कर्तृत्वाचे किस्से अनेकांनी सांगितले.

Vishal Dhume
BJP News : धक्कादायक ; फेसबूक पोस्ट शेअर करीत भाजप नेत्यानं कुटुंबासह जीवन संपवलं..

ढुमे हा अनेकदा पोलिस ठाण्यात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कामाची तपासणी करण्यासाठी येत असताना. कामाची तपासणी करण्यापूर्वी 'अगोदर तुला किती पैसे मिळतात,' हा परवलीचा प्रश्न ते विचारायचे, असे शहरातल्या वेगवेगळ्या ठाण्यातून आलेले अधिकारी,कर्मचारी सांगत होते.

पोलिस आयुक्तालयातील त्यांच्या घरी दूध टाकण्यासाठी येणाया दूधवाल्यास त्याने सोडले नाही. "गुन्हे शाखेच्या एसीपीला पैसे मागतोस का," असे म्हणत विशाल दुमे यांनी दूधवाल्यास चांगलेच खडसावले होते. त्यानंतर त्या दूधवाल्याने मग दूध टाकणेच बंद केले. ढुमेंच्या कटकटीपासून त्याने सुटका करून घेतली.

Vishal Dhume
MNM News : कमल हासन यांचा मोठा निर्णय ; पोटनिवडणुकीत 'या' पक्षाला पाठिंबा

गुन्हे शाखेचा एसीपी असल्याचा रुबाब दाखवून शहराबाहेर ढाबेवाला असो की चिल्लर टपरीचालक, सर्वांनाच त्यांनी त्रास दिल्याचे किस्से सांगितले जात होते. दारू, चिकन, बिर्याणीसोबत त्यांनी दुधवाल्यालाही सोडले नाही.

विशाल ढुमे हा एखाद्या ठाण्याची व्हिजिट करायचा त्यावेळी हद्दीतील हॉटेलचा विषय निघायचा. कोणत्या हॉटेलात खास बिर्याणी, मटण मिळते, याची माहिती मिळाल्यावर ती आणण्याचे फर्मान पोलिस कर्मचायांना सोडले जात असे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com